शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय - काँग्रेस नेत्याची स्तुतिसुमने

By admin | Updated: January 21, 2015 20:21 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय असून ते भारतीयांच्या जवळचे नेते आहे अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी उधळली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.  २१ - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय असून ते भारतीयांच्या जवळचे नेते आहे अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी उधळली आहे.  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानेच मोदींचे कौतुक केल्याने वाद निर्माण होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या वक्तव्यावरुन घुमजाव करत माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला असे स्पष्टीकरणही दिले. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी मोदींचे भरभरुन कौतुक केले. 'मोदींनी भारतीय राजकारणात नवीन युगाची सुरुवात केली.  मतदारांना ते भारताचे नागरिक आहे हे सामाजिकदृष्ट्या समजवण्यात मोदी आणि भाजपा यशस्वी ठरले. ते भावनिकदृष्ट्या भारतीयांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत' असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. 'लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मोदींचा विजय नसून तो काँग्रेसचा पराभव होता' असेही त्यांनी नमुद केले. 
जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून द्विवेदी यांना ओळखले जाते. त्यामुळे द्विवेदी यांनीच मोदींचे कौतुक केल्याने वाद निर्माण झाला. ही मुलाखत प्रसिद्ध होताच द्विवेदी यांनी मुलाखतीमध्ये माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी मोदी युगाची सुरुवात झाली असे म्हटले नसून आता मोदींचे दिवस सुरु असल्याचे म्हटले होते असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीदेखील मोदींचे कौतुक केले होते. मात्र यानंतर त्यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले होते. आता द्विवेदींवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.