शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा गुन्हा; पण आता काही करू शकत नाही

By admin | Updated: July 2, 2014 10:31 IST

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहिती दडवून ठेवणे अथवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) नुसार गुन्हा आहे.

अहमदाबाद : सन २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात वैवाहिक स्थितीसंबंधीचा रकाना कोरा ठेवून त्यावेळचे मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत असले तरी याविषयीची फिर्याद विलंबाने केलेली असल्याने त्यावर ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश आपण पोलिसांना देऊ शकत नाही, असा निकाल येथील दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहिती दडवून ठेवणे अथवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) नुसार गुन्हा आहे. मोदी यांनी २०१२ मध्ये मणिनगर मतदारसंघातून गुजरात विधानसभेची निवडणूक लढविताना आपला जसोदाबेन यांच्याशी विवाह झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती. आता लोकसभेची निवडणूक लढविताना मोदी यांनी प्रथमच आपण विवाहित असल्याचा उल्लेख उमेदवारी अर्जात केला होता व त्यावरून मोठा वादही झाला होता.मोदी यांनी असत्य प्रतिज्ञापत्र करून व ते प्रतिज्ञापत्र स्वीकारून मणिनगर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पी.के.जाडेजा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा केलेला असल्याने त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवावा, अशी फिर्याद आम आदमी पार्टीचे स्थानिक नेते निशांत वर्मा यांनी पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर पोलिसांनी काहीच केले नाही म्हणून त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली होती.मात्र, वर्मा यांची ही फिर्याद फेटाळताना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एम. एम. शेख यांनी नमूद केले,‘प्रतिज्ञापत्रातील संबंधित रकाना कोरा सोडून (मोदी यांनी) लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) अन्वये गुन्हा केल्याचे दिसून येते. पण यासंबंधीची तक्रार एक वर्ष चार महिन्यांनी केली गेली असल्याने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४६८ नुसार या गुन्ह्याची दखल घेण्यास हे न्यायालय असमर्थ आहे.’ म्हणजेच या गुन्ह्याच्या संदर्भात आता ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश आपण देऊ शकत नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)