शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा मोदींचा धाडसी निर्णय - बिल गेट्सनी मांडली 'मन की बात'

By admin | Updated: November 17, 2016 13:13 IST

पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच बिल गेट्सनी मात्र हा निर्णय धाडसी असल्याचे सांगत मोदींचे कौतुक केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ -  ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय धाडसी आहे, असे कौतुकोद्गार काढत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे भारताला काळ्या अर्थव्यवस्थेकडून पारदर्शी अर्थव्यवस्थेकडून घेऊन जाणारा महत्ववपूर्ण निर्णय आहे' असे प्रशस्तीपत्रच गेट्स यांनी दिले आहे. 
राजधानी दिल्लीत निती आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रान्सफोर्मिंग इंडिया’ या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना गेट्स यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. 
'पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा रद्द करुन नव्या नोटा बाजारात आणण्याचा मोदींचा निर्णय धाडसी आहे. नव्या नोटा तयार करताना चोख सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्था पारदर्शकक होईल' असे ते म्हणाले. तसेच या निर्णयामुळे डिजिटल व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि येत्या काही वर्षांमध्ये भारत हा डिजीटाईज्ड अर्थव्यवस्था असलेला देश बनेल' असा विश्वासही गेट्स यांनी व्यक्त केला. 
दरम्यान यावेळी गेट्स यांनी जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले. मात्र ही तर केवळ सुरुवात असून आणखी बरीच सुधारणा करायची आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया आणि आधार कार्ड मोहीमेचेही त्यांनी कौतुक केले. ' ये है मेरे मन की बात' असे सांगत मिश्कील शैलीत गेट्स यांनी भाषणाचा समारोप केला.