मोदी पशुपतीनाथ मंदिरात पूजा करणार

By Admin | Updated: August 3, 2014 02:05 IST2014-08-03T02:05:15+5:302014-08-03T02:05:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नेपाळ दौ:यादरम्यान येथील पशुपतीनाथ मंदिरात अर्धा तास विशेष पूजा करणार आहेत.

Modi worshiped at Pashupatinath temple | मोदी पशुपतीनाथ मंदिरात पूजा करणार

मोदी पशुपतीनाथ मंदिरात पूजा करणार

काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नेपाळ दौ:यादरम्यान येथील पशुपतीनाथ मंदिरात अर्धा तास विशेष पूजा करणार आहेत. 
मोदींचा नेपाळ दौरा उद्या रविवारपासून सुरू होत आहे. सोमवारी ते बागमदी नदीच्या काठावरील या मंदिरातील शिवलिंगाला पंचामृत अभिषेक करून पूजाअर्चा करणार आहेत. त्यांना मंदिराचे मुख्य पुजारी गणोश भट्टा यांच्या हस्ते तीर्थप्रसाद मिळेल. भट्टा दक्षिण भारतातील रहिवासी आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे नवी दिल्ली येथून रविवारी नेपाळला आगमन होत आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Modi worshiped at Pashupatinath temple