शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

YouTubeवर PM मोदी नंबर 1; एक कोटींच्या पार गेले सब्सक्राइबर्स, जगातील मोठ-मोठ्या नेत्यांनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 17:37 IST

PM मोदी भलेही 2007 मध्ये यूट्यूबवर आले असतील. मात्र, त्यांनी पहिला व्हिडिओ 4 वर्षांनंतर म्हणजेच 18 मार्च 2011 रोजी अपलोड केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर 1 कोटी सबस्क्रायबर्स झाले आहेत. एवढे सबस्क्रायबर्स असणारे ते जगातील पहिले नेते आहेत. 26 ऑक्टोबर 2007 रोजी पीएम मोदींनी यूट्यूब जॉईन केले होते. जागतिक नेत्यामध्ये मोदींनंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचा क्रमांक लागतो. त्यांचे 36 लाख सबस्क्रायबर्स आहेत.

गुजरात बजेट-2011 संदर्भात अपलोड केला होता पहिला व्हिडिओ - PM मोदी भलेही 2007 मध्ये यूट्यूबवर आले असतील. मात्र, त्यांनी पहिला व्हिडिओ 4 वर्षांनंतर म्हणजेच 18 मार्च 2011 रोजी अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरात बजेट 2011-12 चा होता. या व्हिडिओवर 35,375 व्ह्यूज आहेत. तसेच 1400 जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. यानंतर त्यांच्या चॅनलवर सातत्याने व्हिडिओ येत राहिले.

मोदींच्या चॅनलवरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. 14 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. हा तरुण मोदींशी बोलतो आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतो. हा व्हिडिओ काशीचा असून 19 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला तब्बल 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 11 लाख लाईक्स मिळाले आहेत.

164 कोटींहून अधिक व्ह्यूज -पंतप्रधान मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi नावानेच आहे. या चैनलवर आतापर्यंत 164 कोटी 31 लाख 40 हजार 180 हून अधिक व्ह्यूज आहेत. या चॅनलवरून ते PMO इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि Exam Warriors Mantras हे YouTube चॅनेल प्रमोटही करतात. एवढेच नाही, तर ते सरकारशी संबंधित योजना, लाइव्ह इव्हेंट्सदेखील आपल्या चॅनलवर दाखवतात.

भारतात मोदींनंतर सर्वाधिक सब्सक्राइबर्स राहुल गांधींचे -भारतात नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक यूट्यूब सब्सक्राइबर्स राहुल गांधीचे आहेत. 5.25 लाख लोकांनी राहुल यांचे यूट्यूब चॅनल  सबस्क्राइब केले आहेत. यानंतर शशी थरूर 4.39 लाख सब्सक्रइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांचे 3.73 लाख सब्सक्राइबर्स आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया