Modi should be put to death: Mamata Banerjee | खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधीलवाद काही थांबताना दिसत नाही. पश्चिम बंगालमधील निवडणुक प्रचाराचे काही तास शिल्लक राहिले असताना निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाडल्याजात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एवढ खोट बोलतात की त्यांना उठबशा मारायला लावल्या पाहिजे असे ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमधील मथुरापुर येथील सभेत त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी भाजप बरोबर आता थेट निवडणुक आयोगावर निशाना साधला आहे. निवडणुक आयोग हे भाजपसोबत भावाची भूमिका बजावत असल्याचे वादग्रस्त विधान ममता बनर्जी यांनी केला आहे. आपल्या या वक्तव्यानंतर तुरुंगात जावे लागले तरी चालेले असा ईशारा ममता यांनी दिला. खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे असे ममता म्हणाल्या.


ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणालाय की, गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला.


भाजपने मूर्ती तोडल्याचे पुरावे आमच्याकडे असताना मोदी हे टीएमसीवर आरोप लावतात.आरोप सिद्ध करा अन्यथा तुम्हाला तुरुंगात पाठवीन असा इशारा ममता बनर्जीनी दिला. मोदींना खोट बोलताना लाज कशी वाटत नाही, असे ही ममता आपल्या भाषणातून म्हणाल्या.


 


 


 

 


 


 

Web Title: Modi should be put to death: Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.