शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज

By admin | Updated: January 11, 2016 02:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवायचा असेल आणि मिशन प्रकल्प सुरू करायचे असतील तर चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज असल्याचे भारतरत्न

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवायचा असेल आणि मिशन प्रकल्प सुरू करायचे असतील तर चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज असल्याचे भारतरत्न विजेते वैज्ञानिक सीआर राव यांनी स्पष्ट केले.एका मुलाखतीत त्यांनी मोदींचे विज्ञान धोरण, धर्म, असहिष्णुता, मदर टेरेसा यांचा संत दर्जा आदी मुद्यांवर दिलखुलास भाष्य केले.प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला विज्ञानविषयक दृष्टिकोन आहे, असे वाटते काय?उत्तर : निश्चितच ते दृष्टिकोन लाभलेले नेते आहेत. त्यांना काही तरी करायचे आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. ते केवळ चांगला सल्ला मानतीलच असे नाही, तर सर्व विस्मयकारी कल्पना प्रत्यक्षात आणतील अशी आशा करू या. तुम्ही त्यांचे भाषण ऐकता तेव्हा ते चांगले काम करतात हे स्पष्टच दिसून येते. प्रश्न : आपण अनेक पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेत सल्लागाराची भूमिका बजावली असून, सध्या ही परिषद मोडीत काढण्यात आली आहे. मोदींना योग्य वैज्ञानिक सल्ला मिळत आहे, असे तुम्हाला वाटते काय?उत्तर : विज्ञान असो की, समाज कोणतीही एक व्यक्ती किंवा मंत्रालय एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रश्न हाताळू शकत नाही. योग्य सल्ला देण्यासाठी मोदींना योग्य लोक मिळतील अशी मला आशा आहे. विज्ञानाची कास धरीत अन्य जगाशी स्पर्धा करताना आपल्याला गरिबीचा प्रश्न सोडवायचा आहे. अवकाश संशोधनातही आघाडी घ्यायची आहे. या सर्व बाबी हाती घ्यायच्या असताना मोदींनी प्राधान्यक्रम ठरवायला हवा. प्रश्न : मोदी विज्ञानाला अधिकाधिक चालना कसे देतील?उत्तर : मोदींनी चांगल्या संस्थांना कमीत कमी का होईना निधी द्यावा. त्यासाठी सध्या सुरू असलेले मूलभूत प्रयत्न थांबविण्याची गरज नाही. रोगनिदान, नवे ऊर्जा तंत्रज्ञान, नवीन अत्याधुुनिक सामग्री आदींसाठी किमान १०-२० कोटी रुपयांचा छोटा निधी देऊन साध्या छोट्या वैज्ञानिक कार्याला व्यापक केले जाऊ शकते. निवडक क्षेत्रात मोठ्या निधीची गरज आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मला भारतातून नव्हे, तर बाहेरून पैसा मिळाला. (वृत्तसंस्था)