शेतकऱ्यांचा अपमान भाजप आमदाराला पडला महागात; ग्रामस्थांनी घातला बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:45 PM2021-02-03T16:45:25+5:302021-02-03T16:48:13+5:30

आमदाराला गावात प्रवेश नाही; तीन गावांच्या बाहेर लागले बॅनर

UP MLA faces boycott in his constituency villages for disrespecting farmers | शेतकऱ्यांचा अपमान भाजप आमदाराला पडला महागात; ग्रामस्थांनी घातला बहिष्कार

शेतकऱ्यांचा अपमान भाजप आमदाराला पडला महागात; ग्रामस्थांनी घातला बहिष्कार

Next

गाझियाबाद: केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये ११ बैठका झाल्यानंतरही अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगित देण्याचा प्रस्ताव सरकारनं दिला आहे. तर शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. भारतीय जनता पक्ष कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहे. भाजपच्या काही नेत्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर टीकादेखील केली आहे. भाजपच्या एका आमदाराला शेतकऱ्यांवरील टीका भोवली आहे. 

...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल

गाझियाबादमधल्या तीन गावांनी त्यांचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर बहिष्कार घातला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या गुर्जर यांना गावात प्रवेश न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तसे बॅनरच बंथाला, बेहता आणि अफझलपूर निस्तोली गावांमध्ये लावण्यात आले आहेत. गुर्जर यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार घालत असल्याची घोषणा तिन्ही गावांनी केली आहे. 

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

नंदकिशोर गुर्जर यांनी मात्र ग्रामस्थांचा दावा फेटाळला आहे. आपण शेतकऱ्यांना धमकावलं नसल्याचं गुर्जर म्हणाले. 'भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केलेले आरोप खोटे आहेत. गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या टिकैत यांनी केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नसून ते कृषी कायद्यांवरून देशाची दिशाभूल करत आहेत,' असं गुर्जर म्हणाले. माझ्यावरील आरोप खरे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली.

आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर बहिष्कार टाकत असल्याचे फलक बंथाला गावात अनेक ठिकाणी लागले आहेत. 'बंथाला गाव आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर बहिष्कार टाकत आहे. शेतकऱ्यांचा अपमान बंथाला गाव सहन करणार नाही,' असा मजकूर असलेले गावात पाहायला मिळत आहेत. बंथाला गावानंतर अफझलपूर निस्तोली गावातही अशाच प्रकारचे फलक दिसू लागले आहेत.

Web Title: UP MLA faces boycott in his constituency villages for disrespecting farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.