"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 3, 2021 03:40 PM2021-02-03T15:40:36+5:302021-02-03T15:43:51+5:30

आता आम्ही बील परत घेण्याची मागणी केली आहे, गादी परत करण्याची मागणी झाली तर काय कराल? असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला केला आहे.

Jind Mahapanchayat Proposal to withdraw farm laws passed, rakesh tikait said what government will do if we demand the return of throne | "आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

Next

जिंद - हरियाणातील जिंद येथे होत असलेल्या महापंचायतीत तिन्ही कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यात कायदे परत घेणे, MSP तसेच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी, आता आम्ही बील परत घेण्याची मागणी केली आहे, गादी परत करण्याची मागणी झाली तर काय कराल? असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला केला आहे.

टिकैत म्हणाले, "जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत, ते आम्ही आमच्या शेतताही लावतो. आता आम्ही बिल वापस घेण्याची मागणी केली आहे, जर गादी परत करण्याची मागणी केली तर काय कराल? तसेच सध्या जिंद वासीयांना दिल्लीकडे कूच करण्याची आवश्यकता नाही. आपण येथेच थांबा.

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

व्यासपीठ तुटले -
हरियाणातील जिंदमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांची महापंचायतीच्या वेळी, येथे तयार करण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. या व्यासपीठावर प्रमाणापेक्षा अधिक लोक चढले होते. यावेळी राकेश टिकैतदेखील व्यासपीठावर होते.

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात पुन्हा हिंसाचार?; गुप्तचर यंत्रणांनी मिळाली धक्कादायक माहिती

शेतकरी आंदोलन एक प्रयोग
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, की हे शेतकऱ्यांचे आंदोलन एक प्रयोग आहे. जर हे यशस्वी ठरले, तर लोक सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. हे कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. एवढेच नाही, तर हे आंदोलन केवळ गृहितकांवरच आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ -
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांची घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

Web Title: Jind Mahapanchayat Proposal to withdraw farm laws passed, rakesh tikait said what government will do if we demand the return of throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.