मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:23 IST2025-08-29T16:22:15+5:302025-08-29T16:23:25+5:30
रायसेन जिल्ह्यातील निकिता लोधी संगरूर (पंजाब) येथे सापडली आहे. तिने पळून जाऊन हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेश सध्या वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत आहे. येथील काही तरुणी बेपत्ता असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच दरम्यान कटनी येथील अर्चना तिवारी नेपाळ सीमेजवळ सापडल्यानंतर आता रायसेन जिल्ह्यातील निकिता लोधी संगरूर (पंजाब) येथे सापडली आहे. तिने पळून जाऊन हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे.
रायसेनच्या गैरतगंज येथील टेकापारची रहिवासी निकिता लोधी १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. खूप शोध घेतल्यानंतर कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. निकिता ८ दिवसांपासून बेपत्ता होती आणि कुटुंब तिचा शोध घेत होते.
१८ ऑगस्ट रोजी ती कॉलेजची फी भरण्यासाठी गेली होती, पण ती घरी परतली नाही. कुटुंबाने नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेतला आणि नंतर हार्वेस्टर चालवणारा तिचा बॉयफ्रेंडही गायब झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. कुटुंब चिंतेत होतं.
भोपाळ, रायसेन आणि जवळच्या भागात शोध घेतला. कुटुंबाने डीजीपी आणि सीएम मोहन यादव यांना विनंती केली जेणेकरून पोलिसांनी अर्चना तिवारीप्रमाणे निकिताचा गंभीरपणे शोध घ्यावा. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर शोधण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी निकिताचं लोकेशन कधी पंजाबमध्ये, कधी तेलंगणातील हैदराबादमध्ये असल्याचं सांगितलं, ज्यामुळे कुटुंबाची चिंता आणखी वाढली. त्यानंतर पोलिसांना पंजाबमधील संगरूरमध्ये निकिताचं लोकेशन मिळालं आणि गुरुवारी संध्याकाळी ती सापडली.
रायसेनचे एसपी पंकज पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणासोबत पळून गेली होती. दोघांनीही पंजाबमधील एका मंदिरात लग्न केलं. आता पंजाब पोलिसांकडे संरक्षणासाठी अर्ज केला आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.