शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: August 4, 2014 03:18 IST

महागाई कमी करतो असे सांगत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. दोन महिन्यांत जनतेला कळून चुकले आहे

अकोला : महागाई कमी करतो असे सांगत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. दोन महिन्यांत जनतेला कळून चुकले आहे, की महागाई कमी करण्याचा भाजपाचा दावा अगदीच खोटा होता. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी अकोला येथे केली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली होती. लोकांना हे सत्य पटवून देण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. तटकरे यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढविला. जनतेची दिशाभूल करून मिळालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीच्या नेत्यांचे पाय जमिनीवर नाहीत. आतापासूनच त्यांचे ४ ते ५ नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. मंत्र्यांचा आकडा तर शंभराच्या घरात पोहोचला, अशा शब्दांत तटकरे यांनी महायुतीची खिल्ली उडवली.महाराष्ट्राला आता गतीमान नेतृत्वाची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्रातील एकमेव गतीमान नेतृत्व आहे. त्यामुळेच त्यांना निवडून द्या, असे आवाहन मी करतो. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पवार यांच्या कामाचा ठसा आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी अजित पवार हेही उपस्थित होते.जातीयवादी पक्षांना पराभूत करणे ही महाराष्ट्रासमोरील गरज आहे, असे सांगून तटकरे म्हणाले, भाजपा आणि शिवसेना हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यांना पराभूत करून महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पाया भक्कम केला पाहिजे.महागाईपासून दिलासा मिळावा, यासाठी जनतेने मोदी सरकारला निवडून दिले; मात्र देशात महागाई वाढतच असून, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते, बियाणे यांचेही भाव गगनाला भिडले आहेत. १९७७ साली इंदिरा गांधींना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता; मात्र १९८० मध्ये त्यांनी पुन्हा सरकार स्थापन केले, याचे स्मरण अजित पवार यांनी करून दिले.