पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 'मिसफायरिंग'

By Admin | Updated: November 19, 2015 09:16 IST2015-11-19T09:10:52+5:302015-11-19T09:16:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७ रेसकोर्स रोड स्थित निवासस्थानजवळ बुधवारी रात्री एका सुरक्षा रक्षकाकडून चुकून गोळी सुटल्याने एकच गडबड उडाली.

'Misfire' near Prime Minister's residence | पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 'मिसफायरिंग'

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 'मिसफायरिंग'

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७ रेसकोर्स रोड स्थित निवासस्थानजवळ बुधवारी रात्री एका सुरक्षा रक्षकाकडून चुकून गोळी सुटल्याने एकच गडबड उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ड्युटी बदलत असताना ही दुर्घटना घडली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पार्किंग लॉटजवळ ड्युटीवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या एक-४७ मधून लागोपाठ तीनवेळा फायरिंग झाले आणि धावपळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी सावध झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेतली असता ड्युटी बदलत असताना हेड कॉन्स्टेबलच्या हातून मिसफायरिंग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव कमाल अततुर्क मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

Web Title: 'Misfire' near Prime Minister's residence