चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:43 IST2026-01-01T15:43:07+5:302026-01-01T15:43:24+5:30
Uttar Pradesh News: रेल्वेचे रुळ ओलांडणं, रुळांवर उभं राहणं हे जीवघेणं ठरू शकतं. रेल्वे रुळावरून जाताना बऱ्याचदा थोडंसं दुर्लक्ष झालं तरी मोठा अपपघात होऊ शकतो. मात्र आज पतंग घेण्यासाठी रेल्वे रुळावर धाव घेणाऱ्या मुलासोबत जे घडलं त्याबाबत ऐकून लोक आश्चर्य व्यक्त करत आहे.

चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
रेल्वेचे रुळ ओलांडणं, रुळांवर उभं राहणं हे जीवघेणं ठरू शकतं. रेल्वे रुळावरून जाताना बऱ्याचदा थोडंसं दुर्लक्ष झालं तरी मोठा अपपघात होऊ शकतो. मात्र आज पतंग घेण्यासाठी रेल्वे रुळावर धाव घेणाऱ्या मुलासोबत जे घडलं त्याबाबत ऐकून लोक आश्चर्य व्यक्त करत आहे. हा ११ वर्षीय मुलगा पतंग लुटण्यासाठी रुळांवर गेला असता अचानक तिथे मालगाडी आली. मात्र मालगाडी अंगावरून गेल्यानंतरही हा मुलगा आश्चर्यकारकरीत्या बचावला.
ही घटना उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यात घडली आहे. येथील शिव केसरी नावाचा ११ वर्षीय मुलगा पतंग लुटण्याच्या नादात सैयदराजा रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरील डाऊन रेल्वे मार्गापर्यंत पोहोचला. तेवढ्यात तिथे एक मालगाडी भरधाव वेगात आली. गाडी जवळ आलेली पाहून घबरलेल्या या मुलाने रुळांवर झोपून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मालगाडीचे सुमारे ४० डबे या मुलावरून गेले. मात्र आश्चर्यकारकरीत्या त्याला साधं खरचटलंही नाही. ट्रेन गेल्यानंतर हा मुलगा सुरक्षितरीत्या बाहेर आला. तेव्हा त्याला पाहून लोक अवाक् झाले. तसेच त्याचे प्राण वाचल्याते पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.