शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांनाच विमानात स्नॅक्स नाकारलं गेलं, अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 4:58 PM

एअर एशियाच्या विमानात घडला प्रकार

नवी दिल्ली: केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या एका कृतीनं सोशल मीडियाची मनं जिंकली आहेत. जयंत सिन्हा 20 नोव्हेंबरला दिल्लीहून रांचीला जात होते. त्यावेळी त्यांनी एअर एशियाच्या विमानातून प्रवास केला. त्यांचा हा विमान प्रवास सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रवासादरम्यान जयंत सिन्हा यांनी नाश्ता ऑर्डर केला होता. मात्र विमानातील कर्मचाऱ्यानं त्यांना नकार दिला. यानंतरही सिन्हा अतिशय शांत होते. विमानात घडलेला हा किस्सा सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशानं ट्विटरवर शेअर केला आहे. जयंत सिन्हा यांनी विमान प्रवासा दरम्यान नाश्ता मागवला. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांना त्यांना नकार दिला. तुम्ही तिकीट आरक्षित करताना दक्षिण भारतीय जेवण ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये नाश्त्याचा समावेश होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला नाश्ता हवा असल्यास त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील, असं कर्मचाऱ्यानं नम्रपणे सिन्हा यांना सांगितलं. यानंतर सिन्हा यांनी कोणताही बडेजाव न दाखवता अतिशय शांतपणे नाश्त्याचे पैसे कर्मचाऱ्याला दिले. हा संपूर्ण प्रकार सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या असद राशिद नावाच्या प्रवाशानं ट्विटरवर शेअर केला आहे. असद राशिद यांच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांनी सिन्हा यांच्या शांत आणि संयमीपणाचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री असूनही त्याचा कोणताही अहंकार न बाळगणाऱ्या सिन्हा यांच्यावर खूप जणांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे राशिद यांचं ट्विट जयंत सिन्हा यांनी रिट्विट केलं आहे. यासोबत सिन्हा यांनी एक स्माईली वापरला आहे. सिन्हा यांच्याकडून इतर राजकारण्यांनी धडे घ्यावेत, असा सल्ला अनेकांनी राशिद यांचं ट्विट रिट्विट करताना दिला आहे. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाair asiaएअर एशियाNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर