शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

करोना लशीची स्वत:वर चाचणी करण्याची मंत्र्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 4:36 PM

करोना लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात समावेश होण्यासाठीची इच्छा अनिल विज व्यक्त केली आहे. हरियाणात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ठळक मुद्देमंत्री अनिल विज यांची स्वत:वर करोना लशीची चाचणी करण्याची तयारीआम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांनाही दिलं प्रत्युत्तरभारत बायोटेकच्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात

चंदीगढकरोना विरुद्धच्या लढ्यात लस तयार करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. देशात काही ठिकाणी लशीची चाचणी देखील सुरू झाली आहे. यात हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी स्वत:वर करोना लशीची चाचणी करण्यास तयारी दर्शवली आहे. 

करोना लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात समावेश होण्यासाठीची इच्छा अनिल विज व्यक्त केली आहे. हरियाणात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 'दिल्लीत करोनाचे रुग्ण वाढण्यासाठी हरियाणाला दोषी ठरवणाऱ्या आम आदमी पक्षाने आधी करोनाला कसं संपवता येईल याबाबत विचार करण्याची गरज आहे. करोनापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना करुन दैनंदीन जीवन जगण्याला प्राधान्य द्यायला हवं', असं अनिल विज म्हणाले. यासोबतच लॉकडाउन संदर्भात कठोर पावलं उचलण्याचीही तयारी असल्याचं ते म्हणाले. 

भारत बायोटेकने करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. यात भारतामध्ये २५ केंद्रांमध्ये एकूण २६ हजार जणांवर याची चाचणी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संसोधन संस्थेच्या देखरेखीखाली या चाचण्या होत आहेत. चाचणी करण्यात येणाऱ्यांवर पुढील वर्षभर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोविड-१९ च्या लशीची भारतात झालेली ही सर्वात मोठी चाचणी ठरणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Vijअनिल विजCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याPoliticsराजकारण