शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
6
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
7
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
8
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
9
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
10
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
11
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
12
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
13
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
14
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
15
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
16
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
17
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
18
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
19
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 21:02 IST

Jaipur Bus Fire: जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली.

जैसलमेर बस दुर्घटनेत अनेकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांमधून उड्या मारल्या. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये व परिसरात मोठी घबराट पसरली. आगीची कारण अस्पष्ट असून पोलीस आणि वाहतूक विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोंक रोडवर जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडची मिनीबसच्या मागच्या बाजूने धूर निघाल्यानंतर काही मिनिटांतच आग लागली. चालकाने त्वरित बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.

प्रवाशांनी या घटनेनंतर सिटी ट्रान्सपोर्टच्या सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ही बस अत्यंत जुनी होती आणि तिची योग्य देखभाल करण्यात आली नव्हती. शहरात धावणाऱ्या अनेक मिनी बसेस जुन्या झाल्या आहेत आणि त्यांची देखभाल होत नाही, यामुळे अशा दुर्घटना वाढत आहे, असाही प्रवाशांनी आरोप केला.

पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. जळालेली बस रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर टोंक रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जयपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेसची देखभाल आणि सुरक्षितता यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaipur: Bus Fire on Tonk Road Sparks Safety Concerns After Jaisalmer Tragedy

Web Summary : Following the Jaisalmer bus tragedy, a Jaipur mini-bus caught fire on Tonk Road. Passengers escaped, but the incident raised concerns about bus maintenance and passenger safety in public transport. An investigation is underway.
टॅग्स :fireआगRajasthanराजस्थान