शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

Y दर्जाच्या सुरक्षेवर होतोय लाखोंचा खर्च? वकिलाच्या प्रश्नाला कंगना राणौतने दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 9:05 AM

कंगनाला दिलेल्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला दहमहा लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने कंगनाना दिलेल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देएखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी केंद्र सरकाराला दर महिन्याला १० लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतातआता कंगना हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षित आहेअशा परिस्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का?

नवी दिल्ली - शिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. तेव्हा कंगनाने मुंबई आपल्यासाठी असुरक्षित वाटत असल्याचे विधान केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला वाय दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला दहमहा लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने कंगनाना दिलेल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी केंद्र सरकाराला दर महिन्याला १० लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे. मात्र आता कंगना हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. 

आता या ट्विटला कंगना राणौतनेही त्वरित प्रत्युत्तर दिले आहे. ब्रिजेशजी, मी काय विचार करते, तुम्ही काय विचार करता याच्या आधारावर संरक्षण दिले जात नाही. इंटेलिजेन्स ब्युरोकडून संभाव्य धोक्याचा तपास केला जातो. त्या धोक्याच्या आधारावार कुठल्या दर्जाचे संरक्षण पुरवायचे याचा विचार केला जातो. ईश्वराची इच्छा असेल तर पुढच्या काही दिवसांत मला दिलेले संरक्षण पूर्णपणे हटवले जाईल. मात्र इंटेलिजेन्स ब्युरोला खराब रिपोर्ट मिळाला तर कदाचित माझी सुरक्षा वाढवली जाईल, असे कंगनाने म्हटले आहे.

शिवसेना आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती. मात्र तिच्या प्रक्षोभक विधानांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडले होते. त्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची तुलना राम मंदिरा आणि बीएमसीची तुलना बाबरच्या सैन्याशी केली होती.मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; पीओकेवरून हटेना, टार्गेट शिवसेना!बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत काल मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला होता. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे. कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमज़ोर समझ कर, बहुत बड़ी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतनं महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचं वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तर मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचा निशाणा शिवसेनेवर साधला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMumbaiमुंबईHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndiaभारतbollywoodबॉलिवूड