शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

१२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:58 IST

Mahakumbh 2025 : भारत देश हा अध्यात्मासाठी जगभर ओळखला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून मन:शांती मिळवता येते, अशी आता जगभर मान्यता आहे.

Mahakumbh 2025 : दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र असं स्थान आहे. त्यातही महाकुंभमेळ्याचं स्थान तर अतिविशिष्ट. यंदा हा महाकुंभ आजपासून म्हणजे १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू होत आहे. २६ फेब्रुवारीला या महाकुंभाची समाप्ती होणार असून, त्यासाठी केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातीलही अनेक भाविकांचं आणि पर्यटकांचं लक्ष लागून आहे. भारतीयांसाठी तर हा उत्सव जीव की प्राण असतोच; देशभरातून कोट्यवधी भाविक या धार्मिक सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतात आणि आपल्या आयुष्याचं ‘सार्थक’ करतात; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय भाविकांसह परदेशी भाविकांनाही गेल्या काही वर्षांपासून कुंभमेळ्याचं मोठं आकर्षण आहे.

भारत देश हा अध्यात्मासाठी जगभर ओळखला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून मन:शांती मिळवता येते, अशी आता जगभर मान्यता आहे. कुंभमेळ्यानिमित्त मोठमोठे ऋषी, साधुसंतही हजेरी लावत असतात. या संतांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांच्याकडून काही शिकावं आणि पदरी पुण्य पाडून घ्यावं, यासाठी सगळ्यांचाच आटोकाट प्रयत्न असतो. 

अलीकडे अध्यात्म समजून घेण्यासाठी, मन:शांती मिळवण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक, श्रद्धाळू येत असतात. यंदाच्या महाकुंभानिमित्त तब्बल १२५ पेक्षाही अधिक देशांचे भाविक, पर्यटक प्रयागराजला हजेरी लावतील, असा अंदाज आहे. परदेशी पर्यटकांना मुळात भारताचं, भारतीय अध्यात्माचं आकर्षण, त्यात महाकुंभ म्हणजे तर या सगळ्याचा कळस. ही ‘पर्वणी’ साधण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. जवळपास एकूण ४० कोटी भाविक या महाकुंभाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात लाखो परदेशी भविक असतील. महाकुंभासाठी जगभरातील टुर ऑपरेटर्सकडे पर्यटकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातही पर्वण्यांच्या तारखांना बुकिंग प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे.  

जाणकारांचं म्हणणं आहे, केवळ भारतीय अध्यात्माच्या मोहानं असंही वर्षभर अनेक परदेशी भाविक भारतात येत असतात; पण कुंभमेळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात जे परदेशी भाविक इथे येतात, ते इथलं वातावरण पाहून अत्यंत भारावून जातात, त्यांना अनेक अनोखे अनुभवही येतात आणि असे बरेचसे भाविक भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्या भारताच्या वाऱ्या वाढत जातात. भारतीय अध्यात्माच्या ओढीनं यंदा असे परदेशी भाविक विक्रमी संख्येनं भारतात स्थायिक होण्याचा विचार करतील.

यंदाच्या प्रयागराज महाकुंभानिमित्त अनेक लहान-मोठ्या देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, युरोप येथील सुमारे एक हजारपेक्षाही अधिक टुर ऑपरेटर्सनी उत्तर प्रदेश पर्यटन विभागाशी संपर्क साधला. अनेक परदेशी पर्यटक आधीच भारतात दाखल झाले आहेत. भारतीय आध्यात्मिक अनुभूतीसाठी हे सारेच भाविक, पर्यटक अतिव इच्छुक असून विशेषत: लक्झरी निवासाला त्यांनी विशेष पसंती दिली आहे. उच्च दर्जाच्या सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्कॉन मंदिरातील खोल्या आणि पंचतारांकित हॉटेल्सना त्यांनी विशेष पसंती दिली आहे.

त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या भाविकांचा प्रामुख्यानं समावेश आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या आणि प्राचीन भारतीय अध्यात्माच्या शोधासाठी भारतात येणाऱ्या या भाविकांना तशाच प्रकारचा अनुभव मिळावा, यासाठी अनेक पर्यटक कंपन्याही प्राधान्यानं प्रयत्न करताहेत. बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या या पर्यटकांना ‘नाराज’ करण्याची कोणाचीही तयारी नाही. केवळ पर्यटक कंपन्याच नव्हे, तर सरकारही या पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे आणि त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे. 

परदेशी पर्यटकांना विशेषकरून प्रश्न येतो, तो भाषेचा. त्यांची ही समस्या सुटावी, यासाठीही शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी ज्यांचं परकीय भाषांवर प्रभुत्व आहे, अशा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नोंदणी पर्यटन विभागानं केली आहे. हे विद्यार्थी परदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांची आध्यात्मिक, सांस्कृतिक अनुभूती समृद्ध करण्यासाठी मदत करतील. 

परदेशी भाविकांना शाहीस्नानाची आस!दर बारा वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. बारा कुंभमेळ्यांचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ आयोजित केला जातो. म्हणजेच दर १४४ वर्षांनंतर महाकुंभ येतो. या ऐतिहासिक महाकुंभाचं आयोजन यंदा प्रयागराज येथे करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आत्यंतिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यातील शाहीस्नानांचं महत्त्व तर अपरंपार. शाहीस्नानाची आणि मोक्षप्राप्तीची संधी आपल्यालाही मिळावी, यासाठीही परदेशी भाविक प्रचंड इच्छुक असतात.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशWorld Trendingजगातील घडामोडी