शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी फसविले

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

लघु उद्योगासाठी ६० ते ७० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगून सदर कर्ज घेण्यासाठी रेखेगाव परिसरातील जवळपास ५० ते ६० नागरिकांकडून प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपये घेऊन सुरज अनिल भांडेकर

गडचिरोली : लघु उद्योगासाठी ६० ते ७० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगून सदर कर्ज घेण्यासाठी रेखेगाव परिसरातील जवळपास ५० ते ६० नागरिकांकडून प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपये घेऊन सुरज अनिल भांडेकर व संजय सदाशिव कोटांगले यांनी फसवणुक केली असल्याचा आरोप पांडुरंग भांडेकर व इतरांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.सुरज अनिल भांडेकर व संजय सदाशिव कोटांगले हे दोघेही रेखेगाव परिसरातील गावांमध्ये डिसेंबर २०१३ या कालावधीत फिरून आपण महाराष्ट्र शासन लघु उद्योग महामंडळ मुंबई- ३२ चे माहिती अधिकारी आहोत. या मंडळाच्यावतीने गरजू नागरिकांना ६० ते ७० टक्के सुटीवर कर्ज उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यापैकी संजय कोटांगले हा गोकुळनगर, गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर नागरिकांचा विश्वास नव्हता मात्र सुरज अनिल भांडेकर हा परिसरातीलच गिलगाव येथील नागरिक असल्याने नागरिकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी नागरिकांना सातबारा, नमुना-८, पॅन कार्ड, पोस्टाचे बचत खाते, स्टेट बँक आॅफ इंडियाचे बचत खाते काढायला लावले. कर्ज मंजूर करण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून १५ हजार ते ४० हजार रूपये रक्कम जमा केली. २ महिन्यानंतर कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगून चेक व्हेरिफीकेशन चार्ज म्हणून प्रत्येकाकडून आणखी ८ हजार रूपये घेतले. १ महिन्यानंतर ३६ नागरिकांना चेक दिले. मात्र काही दिवसांतच संपूर्ण चेक वापस घेऊन कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा करू, असे आश्वासन दिले. मात्र वर्ष लोटूनसुद्धा कर्जाची रक्कम जमा झाली नाही. याबाबत नागरिकांनी विचारपूस केली असता, दोघेही कुठेच अधिकारी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबतची तक्रार नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या दोघांनाही पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पांडूरंग भांडेकर, चंदू कोठारे, रामचंद्र सातपुते यांच्यासह इतरांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. (नगर प्रतिनिधी)