शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 9:50 PM

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधील घोषणांवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं भाष्य

नवी दिल्ली: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केलं. मात्र हे पॅकेज अपुरं असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. सरकारनं प्रवासी मजुरांना मोफत डाळ आणि धान्य देण्याची घोषणा केली आहे. पण दूध, भाजी, तेल आणि घरभाड्यासाठी मजुरांना पैशांची गरज असल्याचं राजन म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी कोरोनाचं संकट, त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि मोदी सरकारनं जाहीर केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज यावर भाष्य केलं. 'कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीत होती. विकास दरात सातत्यानं घसरण सुरू होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला त्यापेक्षा बरंच काही करणं गरजेचं आहे,' असं राजन म्हणाले.  देशाच्या अर्थव्यवस्थेला काही ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. काही बँका, मोठ्या कंपन्या, लघु सूक्ष्म मध्यम क्षेत्रांमध्ये (एमएसएमई) बदलांची गरज आहे. मोदींनी केलेल्या घोषणांमुळे काही क्षेत्रांमध्ये आवश्यक दुरुस्ती होईल. मात्र काही क्षेत्रांमध्ये पूर्णपणे धोरणात्मक बदल गरजेचे आहेत, असं राजन यांनी म्हटलं.आत्मनिर्भर पॅकेजमध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित फारशा मोठ्या घोषणा नाहीत. प्रवासी मजुरांसाठी केलेल्या तरतुदीदेखील अपुऱ्या आहेत. त्यांना मोफत धान्य आणि डाळ दिली जाणार आहे. मात्र यासोबतच त्यांच्या हाती पैसा जायला हवा होता. मात्र तशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असं मत राजन यांनी व्यक्त केलं. ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणारपुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaghuram Rajanरघुराम राजनNarendra Modiनरेंद्र मोदी