पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:33 PM2020-05-21T17:33:50+5:302020-05-21T17:49:44+5:30

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला.

Terrorists fired upon a joint naka party of police and CRPF at Prichoo, Pulwama mac | पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

Next

श्रीनगर: जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या एका तुकडीवर आज (गुरुवार) दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.  यानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या घटनेत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या हल्ल्यात एक जवान जखमी झाले आहे.

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरु असून सीआरपीएफने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली असल्याचे माहिती सांगण्यात येत आहे.

Web Title: Terrorists fired upon a joint naka party of police and CRPF at Prichoo, Pulwama mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.