ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 08:56 PM2020-05-21T20:56:03+5:302020-05-21T21:00:07+5:30

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचं मोठं नुकसान; आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू

Cyclone Amphan PM Modi to take aerial survey of Bengal tomorrow kkg | ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

Next

नवी दिल्ली/कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अम्फान चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. अम्फानचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला बसला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी साडे दहा वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. पंतप्रधान पश्चिम बंगालसोबतच ओदिशाचाही दौरा करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वत: पश्चिम बंगालमध्ये येऊन नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन बॅनर्जींनी केलं होतं. ममतांच्या या आवाहनाला मोदींनी प्रतिसाद दिला आहे. उद्या मोदी पश्चिम बंगालचा दौरा करून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतील. अम्फानमुळे राज्यात आतापर्यंत ७२ जणांचा अम्फानमुळे मृत्यू झाल्याची माहिती ममता बॅनर्जींनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत कधीच अशा प्रकारचं संकट पाहिलं नसल्याचं त्या म्हणाल्या. 



अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. सहा लाख जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अम्फानमुळे झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. 'आतापर्यंत राज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. मी आतापर्यंत असा विनाश कधीही पाहिला नव्हता. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालला येऊन स्वत: परिस्थिती पाहावी,' असं आवाहन त्यांनी केलं. अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.



अम्फान चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मोदींचं ट्विट
अम्फानचा फटका बसलेल्या राज्यांमधील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. 'अम्फानमुळे पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची दृश्यं पाहिली. या काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

'अम्फान'मुळे ७२ जणांचा मृत्यू; मोदींनी स्वत: येऊन परिस्थिती बघावी- ममता बॅनर्जी

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ

पीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखल

तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

Web Title: Cyclone Amphan PM Modi to take aerial survey of Bengal tomorrow kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.