मेट्रो रेल्वेला मिळाली गती - २

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:08+5:302014-12-25T22:41:08+5:30

Metro train accelerated - 2 | मेट्रो रेल्वेला मिळाली गती - २

मेट्रो रेल्वेला मिळाली गती - २

> बॉक्स...
सात माळ्याची प्रशासकीय इमारत

दीक्षाभूमीच्या समोर मौजा लेंड्रा ख.क्र. २२५ नगर भूमापन क्र. १२६१ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बांधकामाकरिता नासुप्रतर्फे निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आला आहे. या कामाचा अंदाजित खर्च २३ कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्याचा नासुप्रचा मानस आहे. ही इमारत एकूण सात माळ्याची असून सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या इमारतीच्या चारही बाजूला लॅण्ड स्केपिंग, हिरवळ व वृक्ष लावण्याचे प्रस्तावित आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौ.मी., तळघर व तळमजला ४०५५.४४ चौ.मी. क्षेत्रात पार्किंग असून ११२ कार, २२४ स्कुटर व २२४ सायकली पार्क होऊ शकतील. पहिला ते पाचवा माळा प्रत्येकी ९१२ चौ.मी. क्षेत्रात कार्यालय. सहाव्या माळ्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० क्षमतेचे ऑडिटोरियम असे एकूण १०३० चौ.मी. क्षेत्र. ही प्रशासकीय इमारत नागपूर मेट्रो रेल्वे कॉपार्ेरेशन लिमिटेडचे कार्यालय असून या कार्यालयातून नागपूर मेट्रो रेल्वेची महत्त्वपूर्ण कामे करण्यात येतील.

Web Title: Metro train accelerated - 2