शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या निवा:याचा प्रश्न अजूनही न सुटण्याची चिन्हे

By admin | Updated: August 24, 2014 02:21 IST

खासदारांना त्यांच्या दर्जानुसार ल्युटेन भागातील बंगले आणि फ्लॅट वितरित करण्यात येईर्पयत तात्पुरते निवासस्थान असलेल्या ‘विठ्ठलभाई पटेल हाऊस’ (व्हीपी हाऊस) होस्टेलमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे.

फराज अहमद - नवी दिल्ली
खासदारांना त्यांच्या दर्जानुसार ल्युटेन भागातील बंगले आणि फ्लॅट वितरित करण्यात येईर्पयत तात्पुरते निवासस्थान असलेल्या ‘विठ्ठलभाई पटेल हाऊस’ (व्हीपी हाऊस) होस्टेलमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे.  अनेक माजी खासदार आणि त्यांच्या पाहुण्यांनी व्हीपी हाऊसमधून हुसकावले जाण्याआधी छत शोधण्यासाठी धावपळ चालविली आहे. खासदारांना कायमचे वास्तव्याचे ठिकाण मिळेर्पयत या होस्टेलमधील 172 किचन अटॅच पॉश खोल्या, चांगल्या प्रसाधनगृहांचा वापर करता येईल. 
यापैकी 5क् खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून अनेक खोल्या लवकरच रिक्त केल्या जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा:यांनी सांगितले. ते सध्या रिक्त खोल्यांमध्ये नवे सोफे, बेड, फ्रीज आणि अन्य सुविधा पुरविण्यात व्यग्र आहेत. प्रत्येक घर आणि फ्लॅटची लोकसभा आणि राज्यसभा कोटय़ात विभागणी करण्यात आली असून दोन्ही सभागृहातील सदस्यांना घरांचे वाटप करण्याचे काम त्या त्या सभागृहाची समिती करीत आहे. विश्वंभर दास मार्गावरील बहुमजली नवे फ्लॅटस् केवळ खासदारांनाच वितरित केले जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.
 
4व्ही.पी. हाऊस अनेकांचे गेल्या काही दशकांपासून कायमचे वास्तव्याचे ठिकाण बनले आहे. अनेक जण आता खासदार नाहीत. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना कुंवर दानिश अली सारखे नेते 1क् वर्षापेक्षा अधिक काळापासून तेथे राहात आहेत. 
 
4दिवंगत माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे सहायक राहिलेले वसिम अहमद हे फार कमी काळ राज्यसभा सदस्य होते. त्यांच्यासह हरीकेश बहादूर, भीमसिंग यांच्यासारखे अनेक किती वर्षापासून राहात आहेत, हे कुणालाच माहीत नाही. बहादूर हे 198क् च्या दशकापूर्वी संसद सदस्य होते. तेव्हापासून ते राहात आहेत. 
 
4जम्मू-काश्मीरचे भीमसिंग यांनी राजवट कुणाचीही असो 17, व्ही.पी. हाऊस हे ठिकाण सोडलेले नाही. त्यांनी ‘व्हाईस ऑफ मिलियन’ हे नियतकालिकही याच ठिकाणाहून चालवले. यावेळीही त्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान संबंधित अधिका:यांना पेलावे लागणार आहे. 
4खासदार नसलेले पी. मुरलीधर राव सध्या भाजपाचे सरचिटणीस बनले असून भीमसिंग हे गेल्या दोन-तीन वर्षापासून त्यांच्यासोबत राहात आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनीही पाहुण्यांसाठी असलेल्या खोल्या अनेक वर्षापासून रिकाम्या केलेल्या नाहीत. नव्या सरकारने अशा प्रकारचे वास्तव्य खपवून घेणार नसल्याचा बडगा उगारल्याने सध्या अनेकांनी  घर शोधण्यासाठी धावधाव सुरू केली आहे.