शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:48 IST

मेहबूबा मुफ्तींनी लाल किल्ल्याच्या घटनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले.

Mehbooba Mufti on Delhi Blast: दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या काश्मीर धोरणांवरून सडकून टीका केली आहे. केंद्र सरकार जगासमोर काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याचे चित्र दाखवते, पण वास्तव पूर्णपणे वेगळे आहे आणि काश्मीरमधील समस्या आता थेट दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. केंद्राने जम्मू आणि काश्मीर सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले होते, पण ती आश्वासने पूर्ण करण्याऐवजी दिल्लीत असुरक्षिततेचे वातावरण पसरल्याचा आरोप मेहबूबा यांनी केला.

श्रीनगर येथे १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. सुरक्षित काश्मीर करण्याऐवजी दिल्ली असुरक्षित करुन टाकल्याचे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. तुम्ही जगाला सांगितले की, काश्मीरमध्ये सगळे काही ठीक आहे, पण काश्मीरमधील अस्वस्थता आता लाल किल्ल्यासमोर घुमू लागली आहे. तुम्ही जम्मू-काश्मीरला सुरक्षित बनवण्याचे मोठी मोठी आश्वासने दिली होती, पण ते  पूर्ण करण्याऐवजी तुमच्या धोरणांनी दिल्लीलाही असुरक्षित करून टाकले आहे," असं मुफ्ती यांनी म्हटलं.  

"एखादा सुशिक्षित तरुण, तोही डॉक्टर, जर स्वतःला आणि इतरांना मारण्यासाठी आपल्या शरीरावर आरडीएक्स बांधत असेल, तर याचा अर्थ देशात सुरक्षितता नावाची कोणतीही गोष्ट उरलेली नाही. ही घटना स्पष्टपणे दर्शवते की देशाची सुरक्षा व्यवस्था किती कमकुवत झाली आहे. हिंदू-मुस्लिम राजकारण करून तुम्ही मते मिळवू शकता, पण देश कोणत्या दिशेने जातोय? राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा फुटीर राजकारणाला प्राधान्य देण्यात येत आहे, असेही मेहबुबा म्हणाल्या.

खोऱ्यात भीतीचे वातावरण

स्थानिक प्रशासनावर हल्लाबोल करताना मेहबूबा मुफ्ती यांनी आरोप केला की, खोऱ्यात सामान्य नागरिकांवर अनावश्यक कठोरता आणि दडपशाही सुरू आहे. "आज स्थिती अशी आहे की, एखाद्या भागात पाणी न आल्याने लोक आवाज उठवतात, तर स्टेशन हाऊस ऑफिसर धमकावतो की घरी जा, नाहीतर पीएसए लावीन. प्रत्येक गोष्टीवर पीएसए, प्रत्येक मुद्द्यावर यूएपीए. तुम्ही भीतीचे वातावरण निर्माण करण्याशिवाय काहीही केले नाही," असा आरोप त्यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mufti slams center after Delhi blast, cites Kashmir policy failure.

Web Summary : Mehbooba Mufti criticized the central government's Kashmir policy following the Delhi blast, stating that the situation in Kashmir has worsened and insecurity has spread to Delhi. She questioned national security, citing a doctor becoming a suicide bomber and alleging that divisive politics are prioritized over safety.
टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीdelhiदिल्लीBlastस्फोटCentral Governmentकेंद्र सरकार