मायावतींचे आरोप निराधार

By Admin | Updated: December 28, 2016 02:28 IST2016-12-28T02:28:42+5:302016-12-28T02:28:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलेले आरोप निराधार असून, बसपच्या बँक खात्यात जमा असलेल्या मोठ्या रकमेबाबत

Mayawati's allegation is baseless | मायावतींचे आरोप निराधार

मायावतींचे आरोप निराधार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलेले आरोप निराधार असून, बसपच्या बँक खात्यात जमा असलेल्या मोठ्या रकमेबाबत कायद्यानुसार कारवाई होईल, असे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर मायावती यांनी केलेल्या आरोपाला प्रसाद यांनी मंगळवारी प्रतिउत्तर दिले. त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.
भाजपाच्या येथील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले की, ‘मोदी यांच्यावरील आरोप हे निराधार व निंदनीय आहेत.’ बसपच्या बँक खात्यात जमा असलेल्या रकमेबद्दल प्रसाद यांनी प्रश्न विचारले. एवढा मोठा पैसा बसपला देणग्यांतून आला की नोटा बदलून तो जमवण्यात आला, याची उत्तरे मायावती यांनी द्यावीत. कायदा त्याचे याबाबत काम करील व मायावती यांना उत्तरे द्यावी लागतील, असे सांगून रवीशंकर प्रसाद म्हणाले की, यामुळेच मायावती या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करीत आहेत. भाजपाने तर अजून काहीही म्हटलेले नाही. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काही महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या अनुपस्थितीवरही रवीशंकर प्रसाद यांनी भाष्य केले.

Web Title: Mayawati's allegation is baseless