शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

 मन की बात : योग्य खबरदारी घेतल्यास दुर्घटना टळतीत - मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 1:23 PM

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 41 व्या भागात विविध मुद्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन देशवासियांना केली.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 41 व्या भागात विविध मुद्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन देशवासियांना केली. त्याबरोबरच विज्ञान दिवस, जागतिक महिला दिन आणि नॅशनल सेफ्टी डे विषयी चर्चा करतानाच मोदींनी होळीविषयीचे आपले अनुभव देशवासियांना ऐकवले. तसेच देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.  नरेंद्र मोदींनी आजच्या मन की बातची सुरुवात विज्ञान दिवसाच्या आठवणीने केली. यावेळी त्यांनी प्राचीन काळातील बोधायन, भास्कराचार्य आणि आर्यभट यांचा उल्लेख केला. तसेच आधुनिक काळातील भारतरत्न सर सी.व्ही. रमन यांचीही आठवण मोदींनी काढली. सर जगदीशचंद्र बोस,  हरगोविंद खुराणा यंच्यापासून सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतवासीयांचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले.  मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 मार्च रोजी होणाऱ्या नॅशनल सेफ्टी डे चा उल्लेख केला. सुरक्षेच्याबाबती निष्काळजीपणा न दाखवल्यास जीवन सुरक्षित होऊ शकते. बहुतांश  दुर्घटना  चुकांमुळे होतात. त्यामुळे चुका टाळल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी एनडीएमएच्या कार्याचेही कौतुक केले. नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी एनडीएमए कायम सज्ज असते. एनडीएमएकडून नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली जात आहे."असे मोदी म्हणाले. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोबोट्स, बोट्स आणि स्पेसिफिक टाक्स करणाऱी यंत्रे बनवण्यास मदत मिळते. आजकाल यंत्रे सेल्फ लर्निंग मधून इंटेलिजेंट आणि स्मार्ट बनत आहेत, त्यामुळे आर्टिफिशन इंटेलिजन्सचा वापर करून दिव्यांगांचे जीवन सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का याची चाचपणी व्हायला हवी. देशवासियांशी संवाद साधताना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज पोहोचलेल्या मुंबई जवळील एलिफंटा येथील 3 गावांचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला.  तसेच महिलांनी स्वत:च्या आत्मबळाच्या जोरावर स्वत:ला स्वयंपूर्ण बनवल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारत