Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:08 IST2026-04-11T10:07:57+5:302026-04-11T10:08:31+5:30
Mathura Boat Tragedy : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावनमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीत बोट उलटल्याने १० भाविकांचा मृत्यू झाला.

Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावनमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीत बोट उलटल्याने १० भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान, आता या घटनेशी संबंधित दोन व्हिडीओ समोर आले आहेत. यातील एक व्हिडीओ अपघाताच्या वेळचा आहे, तर दुसरा व्हिडीओ अपघाताच्या काही काळ आधीचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावनमध्ये यमुना नदीत नौकाविहार करत असताना अचानक बोट उलटल्याने ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अपघाताचा व्हिडीओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. या व्हिडिओमध्ये लोक नदीत बुडताना दिसत असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत. १० पेक्षा जास्त लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना यात दिसत आहेत. इतर बोटमधील लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाही व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.
राधे–राधे गा रहे ये वही पंजाब के तीर्थयात्री हैं, जिनकी स्टीमर वृंदावन की यमुना नदी में पलट गई। अब तक 10 लोगों की मौत हो चुकी है, 5 लापता हैं। किसी ने भी लाइफ जैकेट नहीं पहन रखी। दरअसल, नाव वाले कमाई के चक्कर में ज्यादा लोग बैठा लेते हैं, जबकि उतनी लाइफ़ जैकेट होती नहीं हैं। https://t.co/71YDSy6ujxpic.twitter.com/nhvJtL1VP7
— Sachin Gupta (@Sachingupta) April 10, 2026
अपघातापूर्वी भजन-कीर्तन करत होते भाविक
मथुरा यमुना नदी दुर्घटनेशी संबंधित दुसरा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बोटीमध्ये अनेक लोक बसून आनंद घेत आहेत. सर्व भाविक देवाच्या भक्तीत तल्लीन असल्याचंही यात दिसत आहे. भजन गाणाऱ्या या भाविकांना पुढे काय भयंकर घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती. भजन-कीर्तन सुरू असतानाच अचानक ही बोट यमुना नदीत उलटली.
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
आतापर्यंत १० मृतदेह काढले बाहेर
वृंदावनमध्ये बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली. पंजाबमधील हे भाविक असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप ५ जण बेपत्ता आहेत, तर महिला आणि पुरुष असे एकूण १० जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. बोटमध्ये एकूण ३७ प्रवासी असल्याची माहिती समोर आली असून, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.
Update –
मथुरा DM ने बताया– "लुधियाना से 30 तीर्थयात्री आए थे। यमुना नदी में बोट पलट गई। अभी तक 6 लोगों की डेडबॉडी मिली है। 16–17 लोग सुरक्षित निकाल लिए हैं। बाकी को ढूंढा जा रहा है। आर्मी और NDRF बुलाई गई है। हॉस्पिटलों को हाईअलर्ट पर रखा गया है" https://t.co/Aa793CAfUTpic.twitter.com/UG3uoVAF2o— Sachin Gupta (@Sachingupta) April 10, 2026