क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 01:48 PM2020-09-05T13:48:41+5:302020-09-05T13:51:03+5:30

मुंबई - सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या बॅट तयार करणारे आणि दुरुस्त करणाऱ्या अश्रफ चौधरी (अश्रफ चाचा) यांना कोरोनाची लागण ...

Master blaster Sachin Tendulkar admitted Ashraf Chaudhari who found corona positive | क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

Next
ठळक मुद्देसचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या बॅट तयार करणारे आणि दुरुस्त करणाऱ्या अश्रफ चौधरी (अश्रफ चाचा) यांना कोरोनाची लागण झाली आहे.अश्रफ चाचा हे गेल्या काही दिवसांपासून येथील एका रुग्णालयात दाखल झाले होते. ते किडनीच्या समस्येनेही त्रस्त आहेत.सचिन यांच्या सांगण्यावरून अश्रफ यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई - सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सच्या बॅट तयार करणारे आणि दुरुस्त करणाऱ्या अश्रफ चौधरी (अश्रफ चाचा) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यांच्या मदतीला धाऊन आला आहे. त्याच्या उपचारावरील खर्चही सचिन तेंडुलकरच उचलणार असल्याचे समजते. अश्रफ चाचा हे गेल्या काही दिवसांपासून येथील एका रुग्णालयात दाखल झाले होते. ते किडनीच्या समस्येनेही त्रस्त आहेत.

अश्रफ चाचा हे आधिपासून एका रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, या वेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. हे समजल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून अश्रफ यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्रफ यांचे हितचंतक प्रशांत जेठमलानी हे अश्रफ यांच्या उपचारासाठी पैशांची जुळवा-जुळव करत होते. याच वेळी सचिन तेंडुलकर अश्रफ यांच्या मदतिला धावून आला आहे. 

सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भुजंग पाई यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "अश्रफ चौधरी यांना यापूर्वी चेंबूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयात अश्रफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यानंतर, सचिन तेंडुलकरने माझ्याशी संवाद साधला आणि त्यांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आमच्या रुग्णालयात कोरोना व्हायरसचे उपचार करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत."

"सचिन यांच्या सांगण्यावरून अश्रफ यांना आमच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्रफ चेंबूर येथील रुग्णालयात असतानाही सचिनने तेंडुलकरने अश्रफ यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली होती. आता ते आमच्या रुग्णालयात असून आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत. ते आमच्या देखरेखीखाली आहेत," असेही डॉ. भुजंग पाई यांनी सांगितले. 

वानखेडे मैदानावर इंटरनॅशनल सामने असोत अथवा आयपीएल अश्रफ चाचा अवश्य उपस्थित राहतात. अश्रफ चाचा यांनी सचिन तेंडुलकरसह विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, ख्रिस गेल आणि कीरोन पोलार्ड सारख्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या बॅटदेखील तयार केल्या आहेत आणि दुरुस्तीही करतात. सचिन तेंडूलकर व्यतिरिक्त अभिनेता सोनू सूद देखील अश्रफ यांच्या मदतीसाठी समोर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या -

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?

Web Title: Master blaster Sachin Tendulkar admitted Ashraf Chaudhari who found corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.