PAkistan PM Imran khans close aide General Bajwa looted Pakistan, amassed billions | पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?

पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?

ठळक मुद्देपत्रकार अहमद नूरानी यांनीच सर्वप्रथम बाजवा यांनी भ्रष्‍टाचार करून कमावलेल्या अब्जावधींच्या संपत्तीचा खुलासा केला होता.नुरानी यांनी, पाकिस्तानातील प्रसिद्ध वेबसाइट फॅक्‍ट फोकसवर बाजवांच्या संपत्तीसंदर्भात खुलासा केला होता.बाजवा कुटुंबीयांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या संपत्तीतून एक मोठे उद्योग साम्राज्यच उभे केले आहे.

नवी दिल्ली/इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. देशातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मात्र या वेळी त्यांची अडचण ज्या कारणामुळे वाढली आहे, त्या कारणाचं नाव आहे, पाकिस्तानी सैन्याचे निवृत्त लेफ्टनंन्ट जनरल असीम सलीम बाजवा. पाकिस्‍तानातील एक पत्रकार अहमद नूरानी यांनीच सर्वप्रथम बाजवा यांनी भ्रष्‍टाचार करून कमावलेल्या अब्जावधींच्या संपत्तीचा खुलासा केला होता. यानंतर त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे ट्विट केले होते. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली होती.

नुरानी यांनी, पाकिस्तानातील प्रसिद्ध वेबसाइट फॅक्‍ट फोकसवर बाजवांच्या संपत्तीसंदर्भात खुलासा केला होता. मात्र, बाजवा संबंधित वृत्त खोटे असल्याचे म्हणत, त्यांच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळत आहेत. तसेच हा आपली प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी, तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही भ्रष्‍टाचाराचा आरोप झाला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

विरोधकांची चौकशीचीही मागणी -
बाजवा यांच्या भ्रष्टाचाराच्या वृत्तानंतर, विरोधक सातत्याने इम्रान सरकारवर आक्रमक होताना दिसत आहे. एवढेच नाही, तर ते बाजवा यांच्या चौकशीचीही मागणी करत आहेत. सध्या जनरल बाजवा हे चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरचे चेअरमन असून पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यकही आहेत. या योजनेसाठी चीन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहे. 

उद्योग साम्राज्यात 99 कंपन्यांपैकी 66 मुख्य कंपन्या आहेत. तर 33 कंपन्या फ्रेंचायजी -
भष्टाचारप्रकरणी 'फॅक्ट फोकस'ने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तात, केवळ जनरल बाजवाच नाही, तर त्यांचा भाऊ, पत्नी आणि दोन मुलांचीही नावे आहेत. या मंडळींनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या संपत्तीतून एक मोठे उद्योग साम्राज्यच उभे केले आहे. या वृत्तानुसार, या उद्योग साम्राज्यात 99 कंपन्यांपैकी 66 मुख्य कंपन्या आहेत. तर 33 कंपन्या फ्रेंचायजी आहेत. तर पाच कंपन्या बंद झाल्या आहेत. वृत्तानुसार, बाजवा कुटुंबीयांच्या कंपन्या बाजको ग्रुप नावाने ओळखल्या जातात. यांसाठी तब्बल पाच कोटी डॉलर एवढा खर्च करण्यात आला आहे. 

पिझ्झा कंपनी आणि 133 रेस्टोरंटसह चार देशांत 99 कंपन्या -
याशिवाय त्यांनी अमेरिकेत दीड कोटी डॉलरची संपत्तीही विकत घेतली आहे. या वृत्तानुसार, बाजवा यांच्या मुलांनी 2015 मध्ये बाजको ग्रुपमध्ये पाय ठेवला. त्यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेत बाजको ग्रुपच्या नावाने अनेक कंपन्याही सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे पिझ्झा कंपनी आणि 133 रेस्टोरंटसह चार देशांत 99 कंपन्या आहेत. यांची अंदाजे किंमत सव्वा तीन कोटी डॉलरपेक्षाही अधिक आहे.

अमेरिकेत 71, यूएईमध्ये 7 आणि कॅनाडात 4 कंपन्या -
फॅक्ट फोकसनुसार, बाजवा यांच्या पत्‍नीच्या संपत्तीचे मुल्य पाच कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. त्यांच्या पत्नीचे तब्बल 85 कंपन्यांत शेअर्स आहेत. यांपैकी 82 कंपन्या परदेशी आहेत. बाजको समूहाच्या अमेरिकेत 71, यूएईमध्ये 7 आणि कॅनाडात 4 कंपन्या आहेत. बाजवा यांचा भाऊ एकेकाळी एका पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. मात्र आता तो 133 रेस्‍टॉरंट शिवाय आपल्या फूड चेनचा मालक आहे. गेल्या 10 वर्षांत बाजवा कुटुंबीयांनी अमेरिकेत 13 कमर्शियल आणि पाच रेसिडेंशिअल संपत्ती विकत घेतल्या आहेत. यांची किंमत किमान दीड कोटी डॉलर एवढी आहे. तर ते ज्या कंपन्यांचे मालक आहेत, त्यांची किंमत जवळपास दीड कोटी डॉलर एवढी आहे. 

संबंधित वृत्तानुसार, बाजवांची तीन मुले पाकिस्तानात मायनिंग, कंस्ट्रक्शन, मार्केटिंग, रियल इस्टेट, ब्रेव्हरेज, फॅशन आणि कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग आणि इंव्हेस्‍टमेंट कंपन्यांशी संबंधित आहेत. यांपैकी अधिकांश कंपन्यांचे ते स्वतःच मालक आहेत. याशिवाय यांच्या तीन कंपन्या अमेरिकेतही आहेत. यासर्व कंपन्या 2015नंतर सुरू करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

"मुंबईला पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?" राऊत-कंगनाच्या वादात आता 'या' महिला नेत्याची उडी

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: PAkistan PM Imran khans close aide General Bajwa looted Pakistan, amassed billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.