शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:10 PM2020-09-02T14:10:19+5:302020-09-02T14:12:37+5:30

रमेश साहू उमरी खेडा येथे साईं राम ढाबा चालवत होते. अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Madhya Pradesh Shiv Sena leader Ramesh Sahu shot dead | शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

Next
ठळक मुद्देरमेश साहू उमरी खेडा येथे साईं राम ढाबा चालवत होते.साहू यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाले आहेत. इंदौर जवळील उमरी खेडा येथे ही घटना घडली.

इंदूर -मध्य प्रदेशातील शिवसेना नेते रमेश साहू यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. तर साहू यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. इंदूर जवळील उमरी खेडा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचे समजते. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

रमेश साहू उमरी खेडा येथे साईं राम ढाबा चालवत होते. अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी बचावासाठी आलेल्या रमेश साहू यांच्या पत्नीला आणि मुलीलाही या गुंडांनी मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या आहेत.

मात्र, घटना स्थळावरून कसल्याही प्रकारच्या वस्तूंची अथवा पैशांची चोरी झालेली नाही. यामुळे जुन्या भांडणातून ही घटना घडली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. रमेश साहू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

10 वर्षांपेक्षाही अधिक काळ होते राज्याचे प्रमुख -
रमेश साहू हे मध्य प्रदेशात जवळपास 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ शेवसेनेचे प्रमूख होते. काही अज्ञात गुंड खंडवा रोडवरील त्यांच्या ढाब्यावर आले आणि त्यांनी साहू यांची गोळी घालून हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांचा तपास सुरू -
रमेश साहू यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, लुटीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. तसेच, तेजाजी नगर आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात मृत रमेश यांचे क्राइम रिकॉर्डदेखील आहे. यानुसार पोलीस आता जुन्या भांडणाच्या अँगलनेही गुन्ह्याचा तपास करत आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच सीएसपी आणि एएसपी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

Web Title: Madhya Pradesh Shiv Sena leader Ramesh Sahu shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.