Delhi Fire: दिल्ली मेट्रोच्या स्टाफ क्वार्टरमध्ये भीषण आग; पती, पत्नी आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:50 IST2026-01-06T11:40:29+5:302026-01-06T11:50:50+5:30
Delhi Metro Staff Quarters Fire: दिल्लीतील आदर्श नगर येथील मेट्रो स्टाफ क्वार्टरमध्ये भीषण आग लागली. या दुःखद घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पती अजय, पत्नी नीलम आणि त्यांची १० वर्षांची मुलगी जान्हवी यांचा जळून मृत्यू झाला.

Delhi Fire: दिल्ली मेट्रोच्या स्टाफ क्वार्टरमध्ये भीषण आग; पती, पत्नी आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू
दिल्लीतील आदर्श नगर भागात असलेल्या दिल्लीमेट्रोच्या स्टाफ क्वार्टरमध्ये आग लागली. एकाच खोलीत झोपलेले पती, पत्नी आणि त्यांची निष्पाप मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, त्यांना काल रात्री २.३९ वाजता डीएमआरसी क्वार्टरमध्ये घरातील वस्तूंना आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पाचव्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीत प्रवेश केला तेव्हा त्यांना तीन जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले. ४२ वर्षीय अजय, ३८ वर्षीय नीलम आणि १० वर्षीय जान्ह व्ही अशी मृतांची ओळख पटली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आगीचे कारण अजूनही समजलेले नाही.
सकाळी ६.४० वाजता आग आटोक्यात आली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, घरातील सामान असलेल्या खोलीतून आग लागली आणि आत तीन जळालेले मृतदेह आढळले. आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या राकेशला हाताला दुखापत झाली आणि त्याला जगजीवन रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.