Breaking: महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग, सेक्टर १९ मधील अनेक टेंट जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 17:02 IST2025-01-19T16:56:16+5:302025-01-19T17:02:35+5:30
Mahakumbh Mela Fire: महाकुंभमेळ्यातील शास्त्री ब्रिज सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे आजुबाजुच्या भागात काळ्या धुराचे साम्राज्य पसरलेले आहे.

Breaking: महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग, सेक्टर १९ मधील अनेक टेंट जळाले
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामधील सेक्टर १९ मध्ये भीषण आग लागली असून अनेक टेंट जळून खाक झाले आहेत. जेवण बनवत असताना सिलेंडर फुटल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महाकुंभमेळ्यातील शास्त्री ब्रिज सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे आजुबाजुच्या भागात काळ्या धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. अग्निशमन दलाने संपूर्ण परिसर रिकामा करण्यास लावला असून ट्रेनमधून जाणाऱ्या प्रवाशांनी आगीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
हवेचा वेग जास्त असल्याने ही आग इतर भागातही पसरली आहे. अद्याप जिवीतहानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. या आगीने आता सेक्टर २० मध्येही काही टेंट भस्मसात केल्याचे समजते आहे.
अत्यंत दुःखद! #MahaKumbh में आग लगने की घटना ने सभी को स्तब्ध कर दिया।
— MahaKumbh 2025 (@MahaaKumbh) January 19, 2025
प्रशासन तुरंत राहत और बचाव कार्य सुनिश्चित कर रही है ।
माँ गंगा से सभी की सुरक्षा के लिए प्रार्थना है 🙏 pic.twitter.com/Msg6MGIvUE