शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केल्याने पती मालक होत नाही; पत्नीचे स्वतःचे अधिकार अबाधित: अलाहाबाद हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:17 IST

पत्नी ही पतीचा विस्तार नसून स्वतःचे हक्क आणि इच्छा असलेली व्यक्ती असल्याचेही व्यक्त केले मत

डॉ. खुशालचंद बाहेती

अलाहाबाद : पत्नीचे शरीर, गोपनीयता आणि अधिकार तिचे स्वतःचे आहेत, पतीच्या मालकीचे नाहीत, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे. पतीने गुप्तपणे पत्नीबरोबरच्या एकांतातील कृत्यांचे व्हिडीओ बनवून फेसबुकवर टाकले आणि पत्नीच्या चुलत भावासोबत शेअर केल्याची तक्रार पत्नीने दिली. यावरून पतीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल झाला. तो रद्द करण्यासाठी पतीने हायकोर्टात धाव घेतली.  

अलाहाबाद हायकोर्टात दाखल याचिकेनुसार पतीचे म्हणणे असे आहे की, तो तक्रारदाराचा कायदेशीर लग्न केलेला पती आहे. त्यामुळे यात कलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्याचा  गुन्हा घडलेला नाही. दुसरीकडे, पत्नीने युक्तिवाद केला की ती जरी पत्नी असली तरी तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आणि शेअर करण्याचा पतीला अधिकार नाही. पतीची याचिका फेटाळताना न्यायालय म्हणाले की, पतीने पत्नीचा विश्वास आणि निष्ठेचा आदर करणे अपेक्षित आहे.  फेसबुकवर एकांतातील घटनांचे व्हिडीओ अपलोड करून, पतीने वैवाहिक संबंधांच्या पावित्र्याचे गंभीरपणे उल्लंघन केले आहे. पत्नीच्या संमतीशिवाय अंतरंग तपशील शेअर करणे हे विश्वासाचे आणि कायद्याचे उल्लंघन आहे. 

काय म्हणाले न्यायालय?

  • पत्नी ही पतीचा विस्तार नसून स्वतःचे हक्क आणि इच्छा असलेली व्यक्ती आहे. पत्नीच्या शारीरिक स्वायत्ततेचा आणि गोपनीयतेचा आदर करणे हे कायदेशीर बंधनच नाही, तर समान नातेसंबंधाची नैतिक अनिवार्यता आहे.
  • पत्नीचे शरीर ही तिची स्वतःची मालमत्ता आहे. तिच्या वैयक्तिक आणि जिव्हाळ्याच्या सर्व पैलूंमध्ये तिची संमती सर्वतोपरी आहे. तसेच पती मालक नसून समान भागीदार आहे. गोपनीयता घटनेच्या परिच्छेद २१ अंतर्गत जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अंगभूत भाग आहे, असे न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी नमूद केले.
टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारHigh Courtउच्च न्यायालय