मनमोहनसिंग यांची राजनैतिक सूट कायम

By Admin | Updated: July 12, 2014 01:38 IST2014-07-12T01:38:53+5:302014-07-12T01:38:53+5:30

डॉ. मनमोहनसिंग यांना आता राष्ट्रप्रमुख नसतानाही अमेरिकी न्यायालयात त्यांच्या विरोधात दाखल कथित मानवाधिकार उल्लंघन प्रकरणात राजनैतिक सूट कायम असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकी न्यायालयाने दिले

Manmohan Singh's political resignation | मनमोहनसिंग यांची राजनैतिक सूट कायम

मनमोहनसिंग यांची राजनैतिक सूट कायम

वॉशिंग्टन : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आता राष्ट्रप्रमुख नसतानाही अमेरिकी न्यायालयात त्यांच्या विरोधात दाखल कथित मानवाधिकार उल्लंघन प्रकरणात राजनैतिक सूट कायम असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकी न्यायालयाने दिले. न्याय विभागाने वॉशिंग्टन येथील एका न्यायालयाला याबाबत सूचित केले.
न्यूयॉर्क येथील एका शीख संघटनेने दाखल केलेल्या याचिकेबाबत हे स्पष्टीकरण देण्यात आले. डॉ. सिंग हे आता भारताचे पंतप्रधान नाहीत. त्यामुळे त्यांची राजनैतिक सूट रद्द करण्याची मागणी या संघटनेने केली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये सिंग हे व्हाईट हाऊसमध्ये बराक ओबामा यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा या संघटनेने त्यांच्या विरोधात कथित मानवाधिकार उल्लंघनाचा खटला दाखल केला होता. पंतप्रधानांना समन्स जारी केले होते. मेमध्ये डॉ. सिंग हे पंतप्रधान होते. त्यावेळी न्याय विभागाने सिंग यांना राष्ट्रप्रमुख या नात्याने राजनैतिक सूट असल्याचे सांगितले होते.
शीख फॉर जस्टिस या संघटनेने 16 मेनंतर असा दावा केला, की सिंग हे आता सूट मिळवू शकत नाहीत. कारण आता ते पंतप्रधान नाहीत. न्यायालयाने यावर उत्तर देण्यासाठी न्याय विभागाला 1क् जुलैर्पयतची मुदत दिली होती.
डॉ. सिंग यांच्याविरोधात एलियन टोर्ट क्लेम्स अॅक्ट (एटीसीए) आणि टॉर्चर व्हिक्टिम प्रोटेक्शन अॅक्ट (टीव्हीपीए) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Manmohan Singh's political resignation