शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Manipur Voilence : परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 08:50 IST

Manipur Voilence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच दिवसांपासून राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

केंद्राने मणिपूरमध्ये CRPF बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात जवळपास २००० जवान आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत, या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही  मागणी घेऊन ते राजभवनाकडे कूच करत होते.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड फेकले, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आली आहे.

मणिपूर सरकारने मंगळवारी संध्याकाळी एक सुधारित आदेश जारी केला, ज्यामध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने राज्यभरात पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली होती.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीInternetइंटरनेट