मनपच्या लाचखोर लिपिकांना सहा महिने सक्त मजुरी
By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST
पुणे : दुकानाच्या मिळकत कराच्या आकरणीच्या नोंदीसाठी दिड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या मनपाच्या दोन लिपिकांना न्यायालयाने सहा महिने सक्त मजुरी आणि एक हजाराचा दंड ठोठावला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
मनपच्या लाचखोर लिपिकांना सहा महिने सक्त मजुरी
पुणे : दुकानाच्या मिळकत कराच्या आकरणीच्या नोंदीसाठी दिड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या मनपाच्या दोन लिपिकांना न्यायालयाने सहा महिने सक्त मजुरी आणि एक हजाराचा दंड ठोठावला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.अनुराधा शितकंदे आणि राजू मुरलीधर पाटोळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यावसायिकाने तक्रार दिली होती. तक्रारदाराचे डेक्कन येथील शिंदे भोसले आर्केडमध्ये दुकान आहे. या दुकानाच्या मिळकत कराची नोंदणी त्यांच्या नावे करण्यासाठी आरोपींनी लाच मागितली होती. त्यांच्यावर १८ जानेवारी २०१२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपास पुर्ण झाल्यावर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने त्यावर निकाल देताना कनिष्ठ लिपिक शितकंदे आणि पाटोळे यांना दोषी ठरवत सहा महिन्यांची सक्त मजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.