शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

आवडीची व्यक्ती मुख्यमंत्री व्हावी म्हणून त्याने देवाला वाहिली जीभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 14:48 IST

पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  निवडणुकीत विजय मिळावा यासाठी नेते आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून काम करत आहे.

ठळक मुद्दे पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.पल्या आवडीची व्यक्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावी, असे साकडे देवाला घालत एका व्यक्तीने मंदिरात आपली जीभ कापून वाहिल्याचे समोर आले आहेआपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले

हैदराबाद - पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  निवडणुकीत विजय मिळावा यासाठी नेते आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून काम करत आहे. दरम्यान, आपल्या आवडीची व्यक्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावी, असे साकडे देवाला घालत एका व्यक्तीने मंदिरात आपली जीभ कापून वाहिल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले. 

तेलंगणा राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. महेश असे या जीभ कापून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा बुधावारी श्रीनगर कॉलोनीमधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये आला. इथे पूजा केल्यानंतर तो गुडघ्यांवर बसला. त्यानंतर त्याने आपली जीभ कापून ती देवासमोर ठेवलेल्या दानपत्रात टाकली. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अवलियाला रुग्णालयात दाखल केले.

या व्यक्तीच्या खिशामधून एक पत्र सापडले आहे. तेलंगणा आणि तामिळनाडू या दोन तेलुगू राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या आवडीचे व्यक्ती बनावेत, असे मला वाटते. तसेच राजकारणामध्ये मोठे पद मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या आवडीच्या व्यक्तीने मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर मला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा नवस चिठ्ठीमध्ये लिहून त्याने आपली जीभ कापली. दरम्यान, या तरुणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.   

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशElectionनिवडणूक