भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 05:23 PM2024-05-24T17:23:58+5:302024-05-24T17:31:27+5:30

कारची जोरदार धडक बसल्याने पायी चाललेला तरुण तब्बल 20 फूट हवेत फेकला गेला आणि रस्त्याच्या कडेला पडला. 

man hit by speeding car and fell 20 feet in air horrific cctv footage from dholpur rajasthan | भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज

भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील कौलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बसईनवाब परिसरातील मनियान रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. कारची जोरदार धडक बसल्याने पायी चाललेला तरुण तब्बल 20 फूट हवेत फेकला गेला आणि रस्त्याच्या कडेला पडला. 

अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारच्या धडकेमुळे तरुण 20 फुटांपर्यंत उडालेला दिसत आहे. त्याच्यावर जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील नागला हरलाल गावातील रहिवासी दरब सिंह पायीच आपल्या घरी परतत होता. तेव्हा गावाजवळील मनियान रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. 

घटनेनंतर कार चालक आणखी भरधाव वेगात गाडी चालवत घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

पुण्यानंतर मुंबईतही तेच! 

पुण्यात विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं आलिशान पोर्श कारने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे बाइक चालवत एकाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलानं समोरुन येणाऱ्या बाइकला धडक दिली आणि यात बाइकस्वाराचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या भायखळा येथे ही घटना घडली आहे.

माझगाव येथील नेसबीट ब्रिजवर समोरासमोर बाइकची धडक लागून झालेल्या अपघातात इरफान नवाबअली शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला. आरोपी बाइकस्वार 15 वर्षांचा असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 

Web Title: man hit by speeding car and fell 20 feet in air horrific cctv footage from dholpur rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.