बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला रणरागिणीनं शिकवला धडा, खांबाला बांधून गुप्तांगच कापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:32 IST2018-05-02T14:30:52+5:302018-05-02T14:32:16+5:30
बलात्कार करण्याच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमाला तिनं शिकवला चांगलाच धडा...

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला रणरागिणीनं शिकवला धडा, खांबाला बांधून गुप्तांगच कापलं
लखनौ - उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उत्तर प्रदेशातील इटावामधून आता धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातील घरामध्ये बलात्कार करण्याच्या हेतूनं घुसलेल्या नराधमाचं धाडसी महिलेनं गुप्तांगच छाटल्याची घटना घडली आहे. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी महिलेनं आरोपीला पहिल्यांदा खांबाला बांधलं आणि त्यानंतर त्याचं गुप्तांगच कापून टाकलं. यानंतर महिलेने स्वत:च पोलिसांना घडला प्रकार सांगत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
इटावामधील दुर्गापूर गावात राहाणारी पीडित महिला मंगळवारी रात्री घरात एकटीच होती. याचा फायदा घेण्यासाठी गावातीलच मनोज कुमार हा तरुण तिच्या घरात घुसला व तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र महिलेने प्रतिकार करत त्याला रोखले. त्या महिलेने त्याला बेदम मारहाण करत घरातील खांबाला बांधले व त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूनं त्याचे गुप्तांग छाटलं. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मनोज रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला होता. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा तिचा भाचाच असल्याचे समजते.