शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

'...त्यासाठी फक्त 24 तास पुरेसे, मग SBIला 4 महिने कशाला हवेत?', खरगेंचा केंद्रावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:22 IST

SBI on Electoral Bonds: SBI ने सुप्रीम कोर्टाला इलेक्टोरल बाँड्सचे तपशील देण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ देण्याची विनंती केली आहे. यावरुन काँग्रेस सरकारवर निशाणा साधत आहे.

Electoral Bonds: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला  मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. आता यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी (5 मार्च) केंद्र सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. मोदी सरकार आपले संशयास्पद व्यवहार लपवण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेचा ढाल म्हणून वापर करत असल्याचा आरोप खरगे यांनी केला.

'सरकार एसबीआयला ढाल बनवत आहे'काँग्रेस अध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, 'मोदी सरकार आपल्या देशातील सर्वात मोठ्या बँकेचा वापर निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून होणारे संशयास्पद व्यवहार लपवण्यासाठी ढाल म्हणून करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारची निवडणूक रोख्यांची 'ब्लॅक बनी कन्व्हर्जन' योजना घटनाबाह्य, आरटीआयचे उल्लंघन आणि बेकायदेशीर ठरवून रद्द केली होती. आता न्यायालयाने भाजपला पैसे देणाऱ्या लोकांची माहिती मागितली, पण लोकसभा निवडणुकीनंतर हे काम व्हावे, अशी पक्षाची इच्छा आहे. 

'बनावट योजनेचे मुख्य लाभार्थी भाजप'मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, 'एसबीआयला 6 मार्चपर्यंत देणगीदारांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर हे व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे. या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे आणि SBI ला 30 जूनपर्यंत हा डेटा शेअर करायचा आहे. भाजप या बनावट योजनेचा मुख्य लाभार्थी बनला आहे.

खरगे यांचे सरकारला दोन प्रश्न काँग्रेस अध्यक्षांनी सरकारला दोन प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच हे अपारदर्शक आणि अलोकतांत्रिक असल्याचे सांगत आहे. या अपारदर्शक निवडणूक बॉण्डच्या बदल्यात महामार्ग, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प आदींची कंत्राटे मोदीजींच्या निकटवर्तीयांना देण्यात आली, असे भाजपचे संशयास्पद व्यवहार मोदी सरकार लपवून ठेवत नाही ना? तज्ञांचे म्हणणे आहे की, देणगीदारांच्या 44,434 स्वयंचलित डेटा एंट्री केवळ 24 तासांत समोर आणल्या जाऊ शकतात, मग ही माहिती गोळा करण्यासाठी एसबीआयला आणखी 4 महिने का हवेत? असे दोन प्रश्न त्यांनी सरकारला विचारले.

देशातील प्रत्येक संस्थेचे नुकसान मोदी सरकार, पीएमओ आणि अर्थ मंत्रालयाने आरबीआय, निवडणूक आयोग, संसद किंवा विरोधी पक्ष असोत, प्रत्येक संस्थेचे नुकसान केले आहे. याद्वारे भाजपची तिजोरी भरली जात आहे. आता हताश मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एसबीआयचा वापर करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय