Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:58 IST2026-04-10T16:56:43+5:302026-04-10T16:58:04+5:30
Yamuna River Boat Accident: वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
Vrindavan Boat Accident: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्यानंतर त्यावरील अनेक भाविक नदीच्या पात्रात बुडू लागले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये २५ ते ३० भाविक असल्याचं म्हटलं जात आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने पाण्यात बुडणाऱ्या अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही काही लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#BREAKING: 8 Dead After Devotee Boat Capsizes in Yamuna in Mathura
— upuknews (@upuknews1) April 10, 2026
A boat carrying devotees overturned in the Yamuna River at Kesi Ghat in Mathura after hitting a Pipa bridge. Around 20–25 passengers were onboard; 8 deaths have been confirmed so far.
CM Yogi Adityanath has… pic.twitter.com/GZWbdvy1cL
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेच्या केशी घाटावर ही धक्कादायक घटना घडली. पंजाबमधील भाविकांनी भरलेली एक बोट पुलाला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल
मथुरेतील या भीषण घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Update –
वृंदावन में यमुना नदी में स्टीमर पलटने से अभी तक 6 लोगों की मौत हुई। मथुरा DM ने इसकी पुष्टि की है। स्टीमर में 25 से 30 लोग सवार थे। बाकी को ढूंढा जा रहा है। https://t.co/e6ZeFLoBtopic.twitter.com/EatjW9URwz— Sachin Gupta (@Sachingupta) April 10, 2026