मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:20 AM2021-10-22T11:20:29+5:302021-10-22T11:27:36+5:30

या मोठ्या गडबडीनंतर चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

major lapse in cm yogi adityanaths security in basti district, 4 police suspended | मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती

Next

बस्ती: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या सुरक्षेत मोठी गडबड झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)बस्ती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एक व्यक्ती चक्क बंदूक(Gun) घेऊन शिरला. मुख्यमंत्री कार्यक्रमाला येण्यापूर्वीच त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं. पण, या मोठ्या गडबडीमुळे चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बस्तीचे पोलिस अधीक्षक(SP) आशिष श्रीवास्तव यांनी याबाब सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बस्ती जिल्ह्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमात एक व्यक्ती परवाना असलेली बंदूक घेऊन आला. पण, कार्यक्रम सुरू होण्याच्या 45 मिनिटांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्याकडे बंदूक असल्याचे पाहिले. यानंतर त्या व्यक्तीला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

चार पोलिसांचे निलंबन
या प्रकारानंतर बस्ती जिल्ह्यात तैनात असलेल्या सात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. यापैकी दोन सिद्धार्थनगर आणि एक संत कबीर नगरमध्ये तैनात आहे. तसेच, बस्ती जिल्ह्यात तैनात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित तीन पोलिसांशी संबंधित अहवाल पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला असून, त्यांच्यावरही योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. एसआय विंध्याचल, एसआय हरी राय, शिवधनी, राम प्रकाश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एसआय रमाशंकर मिश्रा, वरुण यादव , अवधेश कुमार यांच्या निलंबनासाठी एसपींनी पत्र लिहीले आहे.

Web Title: major lapse in cm yogi adityanaths security in basti district, 4 police suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.