मुख्य सचिवांवर पोटच्या मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप

By Admin | Updated: September 11, 2016 16:54 IST2016-09-11T16:54:40+5:302016-09-11T16:54:40+5:30

राजस्थानचे मुख्य सचिव ओम प्रकाश मीना यांच्यावर त्यांची पत्नी आणि मुलीने अत्यंत गंभीर स्वरुपाचे धक्कादायक आरोप केले आहेत.

The main secretariat has been accused of sexually exploitation by the daughter of a child | मुख्य सचिवांवर पोटच्या मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप

मुख्य सचिवांवर पोटच्या मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. ११ - राजस्थानचे मुख्य सचिव ओम प्रकाश मीना यांच्यावर त्यांची पत्नी आणि मुलीने अत्यंत गंभीर स्वरुपाचे धक्कादायक आरोप केले आहेत. यावर्षी २१ एप्रिलला मीना यांच्या मुलीने उच्च न्यायालयात आईच्या समर्थन करताना वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. 
 
माझे वडिल नेहमी माझा आणि माझ्या आईचा छळ करायचे. मी त्यांच्यावर ओझे आहे अशा प्रकारची ते मला नेहमी वागणूक द्यायचे. मी १३ वर्षांची असताना त्यांनी माझा विनयभंग केला. माझ्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करुन माझ्यावर जबरदस्ती केली. जवळपास दोनवर्ष माझ्याबरोबर हे सर्व सुरु होते. कोणाला काय सांगणार अशी माझी परिस्थिती होती. रात्र रात्रभर मी बिछान्यात रडत रहायचे असे गीतांजली सिंहने सांगितले. 
 
अखेर एक दिवस मी हिम्मत करुन आईला सांगितले तेव्हा तिने मीना यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. मुलाला जन्म दिला नाही  आणि घटस्फोट देत नाही म्हणून मीना आणि त्यांचे कुटुंबिय माझ्या आईला दोष द्यायचे. कुटुंबियांना मीना यांचे दुसरे लग्न लावून द्यायचे होते असा आरोप मुलीने केला आहे. 
 

Web Title: The main secretariat has been accused of sexually exploitation by the daughter of a child