ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:56 IST2025-06-05T14:54:50+5:302025-06-05T14:56:32+5:30

Mahua Moitra Marriage: माजी खासदारासोबत मोईत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. यानंतर लगेचच नवदाम्पत्य जर्मनीमध्ये फिरताना दिसले आहेत.

Mahua Moitra 2nd Marriage, Wedding: Mahua Moitra tied the knot three days before Operation Sindoor; seen traveling in Germany with former MP Husband Pinaki Misra | ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...

ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...

तृणमूल काँग्रेसच्या प्रसिद्ध खासदार महुआ मोईत्रा यांनी गुपचूप दुसरे लग्न उरकले आहे. माजी खासदारासोबत मोईत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. यानंतर लगेचच नवदाम्पत्य जर्मनीमध्ये फिरताना दिसले आहेत. गुलाबी साडी, मेहंदी, दागिने आणि डोक्यावर कुंकू अशा भारतीय पेहरावात मोईत्रा आपल्या दुसऱ्या पतीसोबत दिसत आहेत. (Mahua Moitra Wedding)

महुआ मोईत्रा यांनी ओडिशाच्या पुरी येथील माजी खासदार राहिलेले पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्न केले आहे. पिनाकी हे बिजू जनता दलाचे नेते आहेत. ते १९९६ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते २००९ ते २०१९ पर्यंत खासदार होते. या दोघांनी ३ मे रोजी लग्न केल्याचे सांगितले जात आहे. महुआ ५० वर्षांच्या आहेत तर त्यांचे दुसरे पती पिनाकी मिश्रा ६५ वर्षांचे आहेत.

महुआ मोइत्रा यांचे लग्न डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झाले होते. मोईत्रा यांनी ब्रॉर्सन यांच्याशी घटस्फोट घेतला होता. यानंतर मोईत्रा तीन वर्षे वकील जय अनंत देहदराय यांच्याशी नात्यात होत्या. मोईत्रा यांच्यावरील कॅश फॉर क्वेरीचे आरोप झाले होते. पैसे घेऊन त्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रकरणात मुंबईतील एका उद्योगपती दर्शन हिरानंदानीने भांडाफोड केला होता. यावरून मोईत्रा यांच्यावर कारवाई देखील झाली होती. खासदारकी गमवावी लागली होती. परंतू, त्या २०२४ मध्ये पुन्हा निवडून आल्या आहेत.  राजकारणात येण्यापूर्वी त्या जेपी मॉर्गन चेसमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या. एनआयसी पोर्टलचे लॉगिन आणि पासवर्ड शेअर केल्याबद्दल कॅश-फॉर-क्वेरी प्रकरणात लोकसभा नीतिमत्ता समितीच्या शिफारसीनंतर ८ डिसेंबर २०२३ रोजी मोइत्रा यांना अपात्र ठरवण्यात आले आणि लोकसभेतून काढून टाकण्यात आले.

Web Title: Mahua Moitra 2nd Marriage, Wedding: Mahua Moitra tied the knot three days before Operation Sindoor; seen traveling in Germany with former MP Husband Pinaki Misra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.