Video - संतापजनक! मिड-डे मीलचं धक्कादायक वास्तव; बादलीभर पाण्यात टाकलं २ पाकीट दूध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:31 IST2026-02-13T15:30:34+5:302026-02-13T15:31:56+5:30

मिड-डे मीलबाबत एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे, ज्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

mahoba mid day meal milk mixed with water video viral school | Video - संतापजनक! मिड-डे मीलचं धक्कादायक वास्तव; बादलीभर पाण्यात टाकलं २ पाकीट दूध

Video - संतापजनक! मिड-डे मीलचं धक्कादायक वास्तव; बादलीभर पाण्यात टाकलं २ पाकीट दूध

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील ढिकवाहा गावातून मिड-डे मीलबाबत एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे, ज्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. येथे दुधात पाणी नाही, तर चक्क बादलीभर पाण्यात अवघे दोन पाकीट दूध मिसळून ते लहान मुलांना देण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्याध्यापिकेच्या उपस्थितीतच हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर आणखी एका व्हिडिओमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या वेळी मुख्याध्यापिका चक्क झोपलेल्या पाहायला मिळत आहेत.

गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना पाण्यात दूध मिसळून पाजलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सरकारी दावे आणि निष्पाप मुलांच्या पोषणाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुख्याध्यापिका मोनिका सोनी यांच्या उपस्थितीत स्वयंपाक करणाऱ्या छविराणीने पाण्याने भरलेल्या बादलीत फक्त दोन पाकीटं दूध ओतलं.

दूध ओतल्यानंतर पाण्याचा रंग हलका पांढरा झाला आणि त्यानंतर ते मुलांना वाटण्यास सुरुवात झाली. व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका अगदी सहजतेने मुलांना दूध पिण्यासाठी बोलावताना ऐकू येत आहेत. स्थानिक लोकांच्या मते, हा केवळ निष्काळजीपणा नसून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात आहे. गावकऱ्यांनी असाही आरोप केला आहे की, शाळेत केवळ जेवणाबाबतच नाही, तर शिक्षणाबाबतही अनागोंदी सुरू आहे.

मुख्याध्यापिका अनेकदा शाळेच्या वेळेत झोपलेल्या आढळतात. नियम धाब्यावर बसवून मनमर्जीने शाळा चालवली जात आहे. मिड-डे मीलच्या बजेटमध्ये कपात करून स्वतःचे खिसे भरण्याचा हा प्रकार आता उघड झाला आहे. या प्रकरणाची दखल घेत शिक्षण अधिकारी (BSA) राहुल मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेच्या आधारावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

Web Title : रोष! मध्याह्न भोजन का सच: बाल्टी भर पानी में मिलाए दूध के पैकेट।

Web Summary : यूपी के स्कूल में मध्याह्न भोजन के लिए दूध के पैकेट पानी में मिलाए गए। प्रधानाध्यापिका इस दौरान दिखीं, बाद में सोती हुई पाई गईं। इस भ्रष्टाचार की जांच के आदेश दिए गए।

Web Title : Outrage! Mid-day meal reality: Milk packets mixed in bucket of water.

Web Summary : UP school mixed milk packets in water for mid-day meal. Headmistress seen during this, later found sleeping. Inquiry ordered into this corruption.