शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी गेलीस तर टॉवरवरून उडी मारेन, पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीचा शोलेस्टाइल ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:11 IST

Madhya Pradesh News : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने उच्च विद्युतप्रवाह असलेल्या टॉवरवर चढून शोलेस्टाइल ड्रामा सुरू केला.

भोपाळ - पती-पत्नींमध्ये भांडणे मतभेद होणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र मध्य प्रदेशमधील एका नवऱ्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर अजब धमकी दिल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या बडवानी येथे पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने उच्च विद्युतप्रवाह असलेल्या टॉवरवर चढून शोलेस्टाइल ड्रामा सुरू केला. सुमारे तासभर चाललेल्या थरारनाट्यानंतर पोलिसांनी या पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवले. पत्नीशी भांडण झाल्यानंतर हा पती उच्चविद्युत प्रवाह असलेल्या टॉवरवर चढला. मात् सुदैवाने त्यावेळी वीजप्रवाह सुरू नव्हता. मात्र हा ड्रामा पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. टॉवरवर सुमारे ८० फूट उंचावर चढलेला पती माहेरी गेलीस तर खाली उडी मारेन, असे पत्नीला सातत्याने सांगत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही सुमारे तासभर हा ड्रामा सुरू होता. अखेरीस पोलिसांनी या पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले.या तरुणाला सातत्याने खाली उतरण्यास सांगण्यात येत होते. मात्र तो पत्नी माहेरी गेली तर खाली उडी मारेन असे तो सातत्याने सांगत होता. दरम्यान, पतीच्या या ड्राम्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तीसुद्धा घटनास्थळी पोहोचली. तसेच पोलीसही हजर झाले. त्यानंतर या पराक्रमी पतीला खाली उतरवण्याची मोहीम सुरू झाली. अखेरीस बराचवेळ समजावल्यानंतर तो खाली उतरला. या तरुणाचा कुठल्यातरी कारणावरून पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने माहेरी जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पतीने टॉवरवर चढून हा ड्रामा सुरू केला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार