शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

महाविरणच्या अभियंत्याचा प्रताप

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

महावितरणच्या अभियंत्याचा प्रताप

महावितरणच्या अभियंत्याचा प्रताप
परस्पर काढली जाहिरात

औरंगाबाद : महावितरणच्या एका सहायक अभियंत्याने महिला कर्मचारी भरती करण्यासाठी वृत्तपत्रात परस्पर जाहिरात दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे त्या अभियंत्याने कार्यालयात काही महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
क्रांतीचौक उपविभागातील सहायक अभियंता संदीप जयस्वाल यांनी ६ फेब्रुवारी रोजी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. टायपिंग येणे आवश्यक आणि वेतन पाच हजार रुपये अशी सूचना त्यात होती. अनेक महिला उमेदवारांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला़ संपर्क साधलेल्या महिलांपैकी पात्र असणार्‍या उमेदवारांच्या ७ फेब्रुवारी रोजी मुलाखती कार्यालयात घेण्यात आल्या. जयस्वाल यांनी केलेल्या कारभाराची माहिती अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी संदीप जयस्वाल याला १२ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत खुलासा न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. महावितरणने शहरातील वीज पुरवठ्याचा ताबा घेऊन तीन महिने झाले आहेत; पण अद्यापही कंपनीने शंभर टक्के कर्मचारी भरती न केल्यामुळे अधिकार्‍यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे जीटीएलकडून वीजपुरवठ्याचा ताबा घेण्यापूर्वी कंपनीच्या मुख्यालयाने ७९९ कर्मचार्‍यांची मंजुरी दिलेली आहे. सध्या शहरात ४७३ कर्मचारी २६ शाखा कार्यालयात कार्यरत आहेत. ३२६ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनाही सेवा-सुविधा मिळत नाही; पण अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत.
---------
चुकून जाहिरात पिं्रट झाली
कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. त्याचे उत्तर देणार आहे. दिलेली जाहिरात चुकून प्रिंट झालेली आहे. माझ्या वैयक्तिक कामासाठी जाहिरात दिली होती. कोणत्याही महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.
- संदीप जयस्वाल, सहायक अभियंता, क्रांतीचौक
--------
कोणत्याही अभियंत्याला परस्पर जाहिरात देता येत नाही. त्यासाठी वरिष्ठांची मंजुरी लागते,जयस्वाल यांनी नियमबाह्य काम केले आहे. नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- एम.एम. शेळके, कार्यकारी अभियंता, क्रांतीचौक