महात्मा गांधी जयंतीे दिनी गड-कोट किल्ला स्वच्छता अभियान राबवावे

By Admin | Updated: September 26, 2015 19:27 IST2015-09-26T19:27:34+5:302015-09-26T19:27:34+5:30

पुणे : महाराष्ट्रातील गडकोटप्रेमींनी २ ऑक्टोबरच्या दिवशी गडकोटांची स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन गड/किल्ले संवर्धन समितीचे सदस्य व रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर शेळके यांनी केले.

Mahatma Gandhi Jayanti will undertake the Gad-Coat Fort cleanliness drive | महात्मा गांधी जयंतीे दिनी गड-कोट किल्ला स्वच्छता अभियान राबवावे

महात्मा गांधी जयंतीे दिनी गड-कोट किल्ला स्वच्छता अभियान राबवावे

णे : महाराष्ट्रातील गडकोटप्रेमींनी २ ऑक्टोबरच्या दिवशी गडकोटांची स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन गड/किल्ले संवर्धन समितीचे सदस्य व रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर शेळके यांनी केले.
राज्यातील गडकोटांवर पावसामुळे गवत व झाडे वाढली असतील तर ती काढून ऐतिहासिक वास्तू स्वच्छ ठेवाव्यात. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असून, या सु˜ीचे निमित्त साधून दुर्गप्रेमींनी आपल्या मित्रमंडळींसह हा उपक्रम राबवावा. गडावर जाणार्‍या रस्त्यावरचा, पायर्‍यांवरचा केरकचरा काढावा. परिसर स्वच्छ करावा. वृक्षारोपण केलेल्या झाडांना आळे करून पाणी घालावे, असे आवाहन शेळके यांनी केले.

Web Title: Mahatma Gandhi Jayanti will undertake the Gad-Coat Fort cleanliness drive