कडक उन्हाने तापतोय महाराष्ट्र, आरोग्याची घ्या काळजी, हवामान खात्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:18 PM2024-04-03T12:18:14+5:302024-04-03T12:19:09+5:30

‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे.

Maharashtra is getting hot due to hot sun, take care of your health, Meteorological Department has warned | कडक उन्हाने तापतोय महाराष्ट्र, आरोग्याची घ्या काळजी, हवामान खात्याने दिला इशारा

कडक उन्हाने तापतोय महाराष्ट्र, आरोग्याची घ्या काळजी, हवामान खात्याने दिला इशारा

 पुणे - ‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

उष्णतेच्या लाटेचा परिणाम मध्य भारतामध्ये अधिक जाणवणार आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बंगाल, महाराष्ट्राचा समावेश आहे.  समुद्रकिनारच्या भागातही फटका बसण्याची शक्यता आहे. 

२ ते ३ अंशांने वाढ
एप्रिल महिन्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच, देशात १ ते ७ एप्रिलदरम्यानचे तापमान सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले जात आहे, त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारी महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये.
-अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ 

Web Title: Maharashtra is getting hot due to hot sun, take care of your health, Meteorological Department has warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.